Friday, June 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAccident : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Accident : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

संतप्त कुटूंबीय ग्रामस्थांचा रास्तारोको

अंबासन । वार्ताहर Ambasan

येथील निमधरा फाट्याजवळ डांबर वाहतूक करणार्‍या डंपरच्या धडकेत चाकाखाली दुचाकीस्वार सापडल्याने तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच कुटूंबीय नातेवाईकांनी आक्रोश करीत फाट्यावर अर्धा ते एक तास रास्ता रोको आंदोलन छेडले. जायखेडा पोलिसांनी समजूत काढल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

- Advertisement -

काकडगाव ते अंबासन रस्त्यावरील रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यातच रस्त्यावरील धुळीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. मालेगावहून डांबर घेऊन नामपूरच्या दिशेने भरधाव जाणार्‍या डंपर क्रमांक (एमएच 41, एयू 5353) वाहनाला ओव्हरटेक करीत असताना दुचाकीस्वार अंकुश दिपक ठाकरे (वय22) रा.श्रीपूरवडे (ता.बागलाण) दुचाकी क्रमांक (एमएच41, एएक्स 0605) ला कट लागल्याने दुचाकी रस्त्यावर फेकली गेली तर अंकुश थेट डंपरच्या मागील चाकाखाली सापडल्याने चिरकडून जागीच ठार झाला.

अपघाताची माहिती मिळताच कुटूंबीय व परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटूंबियांचा एकुलता मुलगा अपघात मृत पावल्याने परीसरातील व नातेवाईकांनी एकच आक्रोश करत संताप व्यक्त केला. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत रास्ता रोको आंदोलन छेडले. जायखेडा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत संतप्त आंदोलकांची मनधरणी केली व मृतदेह नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मयत अंकुश याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण असा परिवार असून श्रीरपुरवडे गावावर शोककळा पसरली आहे.

रस्तांचे काम चालू असतांना अनेक वाहने रस्तांच्या किनार्‍या वरून साईडला पलंटी झाले आहे. सातत्याने अपघात व वाहतूक कोंडीमुळे वाहन धारकांच्या भांडण सुद्ध होतात. मोठ्या प्रमाणावर धुळ उडत असल्यामुळे मोटर सायकल स्वरांचा बॅलन्स चुकतो व अपघात घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरात जोरदार पाऊस; वाकी, पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण परिसरात गत तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल...