Tuesday, November 19, 2024
HomeUncategorizedआरोग्यदूत : मुतखडा

आरोग्यदूत : मुतखडा

मूतखडा स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात होतो. तसेच ज्या व्यक्ती कफप्रधान म्हणजे स्थूल आहेत. मुळात शरीरात पाण्याचे प्रमाण कफापेक्ष जास्त असते. त्यांना हा आजार अधिक होताना दिसतो. 

ज्या ठिकाणी पाण्यातील क्षार अधिक आहेत, पाण्याचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी व तसेच ग्रीष्म व वसंत ऋतूत म्हणजे उन्हाळ्यात त्रास जास्त होतो तसेच ज्या व्यक्तींची बैठक जास्त आहे. 

- Advertisement -

खाण्यामध्ये तिखट, तळलेले, कोरडे, वातूळ पदार्थ जास्त असतात अशांना मूतखडा होण्याची शक्यता अधिक असते. मूतखड्याविषयी चिकित्सा करताना तीन गोष्टी आवश्यक असतात. मूतखडा फुटणे अथवा विरघळणे, मूत्रवाहिनी प्रसरण पावणे व हे खडे अथवा खडा लघवीवाटे बाहेर जाणे. त्याचबरोबर मूतखडा आहे हे निदान नक्की झाल्यानंतर त्याची पथ्ये रुग्णाने पाळणे अत्यावश्यक ठरते. कारण आहे तो खडा गेल्यानंतर पुन्हा दुसरा खडा मूत्रपिंडात निर्माण होऊ नये यासाठी सतत काळजी घेतली पाहिजे. 

मूतखड्याच्या रुग्णाचे पथ्य : आहारात द्रव मूत्रल आहार जास्त असावा. यामध्ये भूक वाढेल, पोट साफ राहील, गॅसेस उत्पन्न होणार नाहीत असा आहार घ्यावा म्हणजे त्रास कमी होईल. यात कोथिंबीर, धने, जिरे, कोबीची भाजी, शेवग्याच्या शेंगांची भाजी तसेच पानांची भाजी, काळे मनुके, तुळशीचे बी आदी प्रकार घ्यावेत. हरभरा डाळ, नुसते शेंगदाणे, तोंडली, वांगी, टोमॅटो, अंजीर, काजू, अळू, मेथीची भाजी, बाजरी, पनीर, मासे, खेकडा आदी क्षारयुक्त व आपधातू दृष्ट करणारे पदार्थ टाळावेत.

बीअर : बीअर नावाच्या मद्यातील प्रकाराने मूतखडा विरघळतो व लवकर पडतो, असा जनसामान्यांचा समज आहे व तसे मोफतचे सल्लेही देतात. परंतु बीअर हा एक द्रव पदार्थ आहे. उडनशील द्रव्ये असलेले हे पेय व ते एकावेळेस जास्त घेतले जाते. म्हणून लघवी जास्त होते, एवढेच आहे. उलटपक्षी बीअरमधील पित्त इष्ट करणारे गुण मूतखडा वाढवू शकतात. 

खडा म्हणजे पाषाण. आयुर्वेदशास्त्राने पाषाणभेद नावाची वनस्पती मूतखड्यावरील चिकित्सेत वर्णन केली आहे. या वनस्पतीच्या नावातच पाषाणाला भेदणारी असे संयोजके आहेत म्हणून याचा काढा इतर गोखरू, पुनर्नवा, करडूचे बी, तुळशीचे बी, शेवग्याची साल, वावडिंग, हिंग, ओवा, सुंठ अशा विविध वनस्पतींच्या बरोबर लक्षणावस्थेप्रमाणे पथ्य पाळून घेतल्यास निश्चितच फायदा होतो. आयुर्वेदशास्त्रात शस्त्रकर्मालाही तितकेच स्थान आहे. आयुर्वेदाने मूतखड्याचा आकार मोठा असल्यास अधिक काटे असलेला, मूत्रपिंडास इजा देणारा असल्यास तो शस्त्रकर्म करून काढावा, असा स्पष्ट उल्लेख करून ठेवला आहे. त्यामुळे आम्ही आयुर्वेदाने खडे पाडतो, विरघळवतो. तरी मर्यादा ठेवून चालतो. पंचकर्मातील निरूह बस्तीचा (काढ्याचा इनिमा) मूतखड पाडण्यास उत्तम उपयोग होतो, असा आमचा अनुभव आहे. तसेच बारीक खडे आयुर्वेदिय औषधांनी पडण्यासाठी व पुन्हा निर्माण न होण्यासाठी 2-3 महिने औषधे घ्यावी लागतात, हेही तितकेच खरे. कधी कधी मोठे खडेसुद्धा औषधांनी योग्य तज्ज्ञ वैद्याकडून उपचार करून घेतल्यास विरघळू अथवा पडू शकतात.

जर का मूतखड्याचे निदान लवकर झाले व रुग्णाने तत्काळ आयुर्वेदिय औषधांचा व पथ्यांचा अवलंब घेतला तर मूतखडा निश्चितच त्रास न देता शरीरातून बाहेर फेकला जाऊ शकतो व ‘पाषाणवृक्क’ असलेली व्यक्ती आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकते. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या