मुंबई । Mumbai
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. प्रचार थांबला असला तरी पक्ष आणि उमेदवार छुप्या पद्धतीने प्रचार करताना दिसत आहेत. आहे. तर काही ठिकाणी पैसे वाटप होत असल्याचाही आरोप होत आहे. असाच काहीसा प्रकार विरारमध्ये पाहायला मिळाला.
विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा घातलला आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विनोद तावडे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान या राड्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. भाजपचा खेळ खल्लास,” असं म्हणत संजय राऊतांनी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या हॉटेलमधील व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला कॅप्शन देताना संजय राऊतांनी, “जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले. निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो, असा टोला लगावला आहे.





