Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याअवघे गर्जे पंढरपूर

अवघे गर्जे पंढरपूर

पंढरपूर । वार्ताहर Pandharpur

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी दहा लाखाहून अधिक भाविकांची पंढरीत गर्दी झाली आहे. विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये बाळगून आळंदी आणि देहूवरून पायी चालत निघालेल्या ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांनी काल सायंकाळी पंढरीत प्रवेश केला.

- Advertisement -

दरम्यान, आषाढी दशमी दिवशी पहाटेपासूनच चंद्रभागा नदीमध्ये स्नानाची पर्वणी साधण्यासाठी लाखो भाविकांनी चंद्रभागा तिरी गर्दी केली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्याच्याही पुढे गेली होती. श्री विठ्ठलाच्या पददर्शनासाठी आज वीस तास तर मुखदर्शनासाठी चार ते पाच तास लागत होते.

विठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी॥

आषाढी यात्रेला आलेल्या लाखो भाविकांच्या विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे.आषाढी यात्रेला येणार्‍या प्रत्येक भाविकाला ज्याप्रमाणे विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली असते त्याचप्रमाणे चंद्रभागेमधील स्नानाची देखील ओढ असते. त्यामुळेच बुधवारी दशमीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी चंद्रभागा तिरी भाविकांचा अथांग जनसागर लोटला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या