Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याआमच्या मतावर...; अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

आमच्या मतावर…; अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai

शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कठोर टीका करताना दिसत आहेत. अशातच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून शिंदे गटावर टीका केली होती. शिवसेना सोडून जे गेले त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर आता कृषी मंत्री अब्दुल सत्तार (adbul sattar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हालाही याच्यापेक्षा वाईट शब्दात बोलता येतं असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टिका केली आहे. ते म्हणाले की, “आमच्या मतावर कुत्र्याला राज्यसभेवर पाठवलं आहे. कुत्र्याची अवस्था कशी झालेली आहे. रोज सकाळी उठतो आणि आमच्यावर भुंकतो. त्याच्यापेक्षाही वाईट शब्दात आम्हाला बोलता येतं. परंतु एखाद्या कुत्र्याला आम्ही राज्यसभेमध्ये पाठवलं आहे. असे असून आम्हाला कुत्रा बोलत असतील तर त्यांच्यासारखा महाकुत्रा कोणताच नसेल, असे सत्तार म्हणाले आहे.

मराठी भाषेची गळचेपी कराल, तर…; राज ठाकरेंचा थेट इशारा

तसेच, हिंमत असेल आणि माणसाची औलाद असेल तर त्यांनी राजीनामा देऊन परत निवडूण यावं. मी पण राजीनामा देतो त्यावेळ कळेल कोणाची औलाद आहे. मी सामना वाचतच नाही. त्यामध्ये वाचण्यासारखं काहीच नाही. सामना वाचून काही फायदा नाही. दुसऱ्याला जो कुत्रा बोलतो तो पहिला कुत्रा असतो. म्हणून कुत्रे त्याला दिसतात. अशी भाषा बोलणाऱ्यांनी जीभेला लगाम द्यावं आम्हालाही याच्यापेक्षा वाईट भाषेत बोलता येतं,” असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.

राज ठाकरे फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव का घेत नाही? छगन भुजबळांचा बाण

असे कृषी मंत्री आम्ही पाहिले नाहीत अशी टीका केली जाते त्यावर अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले आहे. “उद्धव ठाकरेंना सोडून येताना मी त्यांनी पाहिले नाही. माझ्या इतका कोणताच कृषिमंत्री फिरलेला नाही. त्यांचे दुखणं वेगळं आहे. ते कधीच बांधावर जात नाही. त्यांना बांध माहिती असता तर बांध फुटला नसता आणि ४० आमदार गेले नसते,” असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? समोर आली ‘ही’ मोठी अपडेट

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या