नवापूर । Navapur। श.प्र.
नवापूर तालुक्यातील तिनटेंबा येथील खूनाच्या (murder) प्रयत्नाच्या गुन्ह्यातील 39 वर्षापासुन फरार (fugitive) असलेल्या संशयीत आरोपीस (Suspected accused) नवापूर पोलीसांनी (Nawapur Police) गुजरात राज्यातुन अटक (arrested) केली आहे.
बसच्या धडकेत दुचाकीस्वार तीन वर्हाड्यांचा मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी की, फत्तेसिंग बाबजी मावची रा. तिनटेंबा ता. नवापुर जि. नंदुरबार याच्या विरुध्द् नवापुर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 307 प्रमाणे दि.12 फेब्रुवारी 1984 रोजी गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आज पर्यंत 39 वर्षापासून संशयीत आरोपी फत्तेसिंग बाबजी गावीत हा फरार होता.
13 मार्च रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नमुद गुन्हयातील फरार संशयीत आरोपी फत्तेसिंग बाबजी मावची हा व्यारा शहरातील एका कापड मिलमध्ये मजुरीला असून तो त्याची पत्नी व तिन मुलांसह गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील आमली पोस्ट वझरदा ता. सोनगढ येथे वास्तव्यास राहात असल्याची माहीती मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना सांगितल्याने श्री. वारे यांनी यांनी सदर बातमीची खात्री करुन फरार आरोपीला अटक करण्यासाठी नवापूर पोलीस ठाण्याचे एक पथक तात्काळ गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात रवाना केले.
नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील व्यारा शहर गाठून तेथे फरार आरोपी फत्तेसिंग बाबजी मावची याचा शोध घेण्यास सुरुवात केली, परंतु आरोपी हा 39 वर्षापासून फरार असल्याने त्याचा फोटो किंवा इतर माहिती पथकाकडे नव्हती तसेच तो सहज कोठे बाहेर येत नाहीत व आपले अस्तित्व लपवून वेषांतर करुन फिरत होता. त्यामुळे त्यास ओळखणे कठीण झाले होते.
कन्नड घाटात आढळलेल्या महिलेच्या सांगाड्याबाबत गुढ कायमच
नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाला आरोपीताबाबत इत्थंभूत माहिती काढण्यात पथकाला यश मिळाले व नमुद आरोपी हा व्यारा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने व्यारा रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून त्याचा शोध घेत असतांना त्याठिकाणी सुमारे 60 ते 65 वर्षाचा एक इसम फिरतांना दिसला. पथकाने त्या इसमाला आवाज देताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला म्हणून नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाला संशय आल्याने त्यास पोलीसांनी त्यास पाठलाग करुन शिताफीने फत्तेसिंग बाबजी मावची रा. तिनटेंबा ता. नवापुर जि. नंदुरबार ह. मु. आमली पोस्ट वझरदा ता. सोनगढ जि. तापी ( गुजरात) यास ताब्यात घेतले.
आरोपी हा वरील गुन्हयातील फरार आरोपी असल्याची खात्री झाल्याने त्यास पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. 39 वर्षापासून फरार आरोपीतास बेड्या ठोकून उत्कृष्ट कामगिरी करणार्या पथकास पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकास 10 हजार रुपये रोख बक्षिस जाहीर केले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ,पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, नितीन नाईक, सुनिल निकम यांच्या पथकाने केली आहे.