Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Police Recruitment : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला 'इतक्या' उमेदवारांची दांडी

Nashik Police Recruitment : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला ‘इतक्या’ उमेदवारांची दांडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर व ग्रामीण पोलिस (City and Rural Police) दलातील शिपाई पदाच्या भरतीत मैदानी चाचणीच्या निकालाअंती निवड झालेल्या उमेदवारांची रविवारी (दि. ७) शंभर गुणांची लेखी परीक्षा (Written exam) पार पडली. या परीक्षेनंतर शहर व ग्रामीण पोलिसांनी तत्काळ उत्तरतालिका जारी केली. दरम्यान, शहर पोलिसांनी परीक्षेच्या चारही प्रश्नसंचातील एक प्रश्न तांत्रिक कारणाने बाद केला असून ज्या उमेदवारांनी हा प्रश्न सोडविला आहे, त्यांना एक गुण दिला जाणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : भाईगिरी करताे म्हणून काढला काटा

मुंबई (Mumbai) वगळता राज्यभरात पोलिस भरतीची (Police Recruitment) लेखी परीक्षा रविवारी घेण्यात आली. त्यानुसार नाशिक शहरातील ११८ रिक्त पदासांठी १ हजार १९७ उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली. तर ग्रामीण दलात ३२ रिक्त जागांसाठी ३१६ उमेदवार पात्र ठरले होते. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, प्रशांच बच्छाव यांच्या पथकाने परीक्षेदरम्यान सर्व सुविधांसह बंदोबस्ताची पाहणी केली. तर शहर पोलिसांची केटीएमएम महाविद्यालयात व ग्रामीण पोलिसांची भुजबळ नॉलेज सिटीत परीक्षा घेण्यात आली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ओळखीचा फायदा घेत तीन काेटींचा गंडा; पाच गुन्हे नाेंद

सकाळी सात ते नऊ यावेळेत बायोमेट्रिकनुसार उमेदवारांची (Candidate) हजेरी घेण्यात आली. फक्त ‘चेस्ट क्रमांक’, आधारकार्ड व प्रवेश पत्र नेण्यास मुभा होती. सकाळी अकरा ते बारा या वेळेत लेखी परीक्षा झाल्यानंतर दुपारी उत्तरतालिका जारी करण्यात आली. दरम्यान, शहर परीक्षेत १५ उमेदवारांनी दांडी मारली. तर प्रश्नपत्रिकेतील बुद्धीमत्ता विषयातील प्रत्येकी एक प्रश्न तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. त्यासंदर्भात आयुक्तालयाने उत्तरतालिकेत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे उमेदवारांना एक गुण पोलिसांकडून (Police) मिळणार आहे.

हे देखील वाचा : नाशिकमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हिट अ‍ॅण्ड रन

पोलीस प्रशासनाकडून उमेदवारांची बायोमेट्रिक चाचणी

केंद्रात जाण्यापूर्वी पोलीस प्रशासनाकडून उमेदवारांची बायोमेट्रिक चाचणी घेण्यात आली. उमेदवाराचे प्रवेश पत्र, ओळखपत्र, चेस्टनंबर आणि फोटो घेतल्यानंतर परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. लेखी परीक्षा सुरळीत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले. परीक्षेला १ हजार १९७ उमेदवारांपैकी १ हजार १८२ उमेदवारांनी हजेरी लावली.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या