Monday, June 9, 2025
Homeअग्रलेखनिरपेक्ष मदतीचे प्रेरणादायी उपक्रम!

निरपेक्ष मदतीचे प्रेरणादायी उपक्रम!

मानवता किंवा माणुसकी हाच खरा धर्म आहे Humanity is the true religion असा उपदेश अनेक संतांनी केला आहे. ‘पुण्य पर उपकार पाप ते परपीडा’ असे संत तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे. ‘करीता परोपकार। त्याच्या पुण्या नाही पार’ असे संत सेना महाराज म्हणत. गुरु नानकदेवांनी आपल्या भक्तांना मकाहेरे बन खोजन आई ? पुष्पमध्य जिहुँ गंध बसत है, मुकुरमाँही जिहुँ छाई । सर्वनिवासी सदा अलेपा तोरे संग समाई॥ (बाबारे ! कशाला त्या ईश्वराला धुंडायला जातोस ? फुलांतील सुगंधाप्रमाणें सर्व जगांत व्यापून राहिलेला, आरशांतील पडछायेप्रमाणें नेहमी निर्लेप असणारा, तो प्रभु तुझ्यांत नि तुझ्या आजूबाजूस सर्वत्र भरलेला आहे, त्याचीच भक्ति कर) असे सांगितले होते. परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम्फ हे संस्कृत सुभाषितही प्रसिद्ध आहे. ‘तुम्ही हात फिरवाल तिथं लक्ष्मी उभी राहील अन गांव भूवैकुंठ होईल’ असे संत गाडगेबाबा नेहेमी म्हणत. ‘नाम फाउंडेशन’सारख्या सामाजिक संस्था, काही व्यक्तीसमूह संतांचा हा उपदेश अंमलात आणण्याचा सतत प्रयत्न करतांना आढळतात.

- Advertisement -

मार्च महिन्यात पुण्याजवळील बहुली गावात Bahuli village काही घरांना आग लागली होती. या आगीत 16 घरे जळून बेचिराख झाली होती. त्यावेळी नाम फाउंडेशनच्या वतीने नाना पाटेकर Nana Patekar यांनी आपदग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला होता. दोन-तीन महिन्यात तुमची घरे बांधून देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले होते. त्याप्रमाणे नाम फाउंडेशनच्या वतीने 16 घरे बांधली गेली. त्याच्या चाव्या नाना पाटेकर Nana Patekar यांच्या हस्ते नुकत्याच घरमालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या. याच फाउंडेशनतर्फे खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. लेह परिसरात संस्थेने ‘पाणी वाटप यंत्र (वॉटर एटीएम)’ बसवले आहेत. मूल्यसंवर्धनाचा, सामाजिकतेचा आणि बांधिलकाचा वारसा तरुणाई पुढे चालवू शकते असा विश्वास नाना पाटेकर Nana Patekar यांनी अनेकदा व्यक्त केला आहे. ‘प्रहार’ सारख्या काही सिनेमांमधून त्यांनी हाच संदेश दिला आहे. मराठी मुलखातील दोन मुली दुबईमध्ये शिकतात.

चिपळूण पुराच्या बातम्या बघून आणि वाचून त्या अस्वस्थ झाल्या. त्या तेवढ्यावरच थांबल्या नाहीत. अवघ्या 16-17 वर्षांच्या या मुलींनी समाजमाध्यमांवरून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मोहीम राबवली. त्याच्या साथीला तेथून अजून 3-4 मुली पुढे आल्या. त्यांनी दुबई आणि शारजा मध्ये पाच ठिकाणी मदत संकलन केंद्रे उभारली. त्यांच्या धडपडीला तेथील महाराष्ट्रीय मंडळींनी देखील साथ दिली. त्यांनी जमा केलेल्या मदतीची एक खेप कोकणात स्थानिक जिल्हाधिकार्‍यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीत सामाजिक ऋणाचेही महत्व सांगितले आहे. कोणताही गाजावाजा न करता विधायक काम कसे करावे याचे उत्तम उदाहरण दुबईतील लहान मुली आणि नाम फाउंडेशनने समाजासमोर घालून दिले आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे Nana Patekar and Makrand Anaspure यांनी’ ‘नाम फाऊंडेशन’ Nam Foundation संस्था स्थापन केली आहे. ते दोघेही प्रख्यात चित्रपट अभिनेते आणि नेहेमीच प्रसिद्धीच्या झोतात वावरणारे. सतत चर्चेत राहाणे ही या क्षेत्राची सध्याची प्रमुख गरज मानली जाते. तथापि नाम फाउंडेशनचे सामाजिक काम आणि चित्रपटसृष्टीचा मोठा पडदा यामध्ये या दोघांनी नेहेमीच योग्य अंतर राखले.

नाम फाउंडेशनच्या Nam Foundation कामाचा स्व प्रसिद्धीसाठी वापर करण्याचा मोह सर्वस्वी बाजूला ठेवला. उलट समाजाच्या मदतीसाठी त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेचा उपयोग मात्र करून घेतला. बहुली हे खडकवासला पासून जेमतेम 20 किलोमीटर अंतरावरील गाव. तथापि या गावातील 16 घरे जळून खाक झाली हे किती पुणेकरांना माहित असेल? कारण स्वतःचे कौतूक करणे आणि करवून घेणे एवढेच पुणेकरांना जास्त आवडते असा एक प्रवाद आहे. आता पुणेकर सुद्धा अनुकूल प्रसिद्धी म्हणून त्या प्रवादाची मजा घेतात. पुण्याजवळील बहुली गावातील लोकांसाठी घरे बांधून नाना आणि मकरंद Nana Patekar and Makrand Anaspure यांनीही निरपेक्ष मदतीचा उत्तम धडा सगळ्या पुणेकरांसाठी घालून दिला असे म्हणावे का? दुबईत शिक्षण घेणार्‍या मुली आणि नाम फाउंडेशनचे Nam Foundation मदतीचे उपक्रम इतरांनी प्रेरणा घ्यावे असेच आहेत. प्रेरणा घेण्यात पुणेकरही सहभागी झाले तर सगळ्या मराठी मुलखाला ते परिवर्तन कौतुकास्पदच वाटेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : जेऊर बायजाबाई येथील कत्तलखान्यावर छापा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांनी जेऊर बायजाबाई (नगर) गावातील एका गोठ्यावर छापा टाकून गोवंशीय जनावरांची कत्तल करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला असून या...