Saturday, July 25, 2026
HomeनगरPathardi : कारेगाव येथे दोन बालविवाह प्रशासनाने रोखले

Pathardi : कारेगाव येथे दोन बालविवाह प्रशासनाने रोखले

बाल संरक्षण समितीसमोर होणार सुनावणी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील कारेगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. चाईल्ड लाईनला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस, ग्रामविकास विभाग आणि बाल संरक्षण समितीच्या पथकाने संयुक्त कारवाई करत ही लग्ने थांबवली. रविवारी (दि.8) सकाळी 10 वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी 4 वाजता पूर्ण झाली. या प्रकरणी वर, वधू आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून त्यांना अहिल्यानगर येथील बाल संरक्षण समितीसमोर हजर राहण्याचे पत्र देण्यात आले आहे.

- Advertisement -

चाईल्ड लाईनला कारेगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचे विवाह होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे चाईल्ड लाईनने तातडीने पोलिस आणि ग्रामविकास विभागाशी संपर्क साधला. रविवारी सकाळी पोलिस, ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि बाल संरक्षण समितीचे सदस्य कारेगाव येथे पोहोचले. त्यांनी विवाहाच्या तयारीची पाहणी केली आणि मुलींचे वय तपासले. दोन्ही मुली अल्पवयीन असल्याचे आढळून आल्याने लग्न थांबवण्यात आले.

या कारवाईदरम्यान, प्रशासनाने संबंधितांना दिलेल्या पत्रात पुढील सुनावणी आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, अल्पवयीन मुलींच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देशही देण्यात आलेत. या प्रकरणी पुढील सुनावणी अहिल्यानगर येथील बाल संरक्षण समितीसमोर होणार आहे. यावेळी मुलींच्या हितासाठी आवश्यक निर्णय घेतले जाणार असून, त्यांच्या शिक्षण आणि संरक्षणावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

कारेगाव येथे एकाच आडनावाच्या दोन विवाहांपैकी एका अल्पवयीन मुलीच्या विवाहाची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बालविवाह रोखण्यासाठी गेलेल्या पथकाला गावात दोन बालविवाह होत असल्याचे आढळले. पथकाने तातडीने कारवाई करत दोन्ही विवाह रोखण्यात यश मिळवले.

ताज्या बातम्या

Onion Rate : घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

0
नेवासा | Newasa येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) शनिवारी कांद्याची 55 हजार 373 गोण्या आवक झाली. भाव 2700 रुपयांपर्यंत...