Thursday, April 30, 2026
Homeदेश विदेशDonald Trump: अटी मान्य करा नाही तर अश्मयुगात…; डोनाल्ड ट्रम्पला इराणला गंभीर...

Donald Trump: अटी मान्य करा नाही तर अश्मयुगात…; डोनाल्ड ट्रम्पला इराणला गंभीर इशारा, म्हणाले, हा संघर्ष काही कालावधीत…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाला आता १ महिना पूर्ण झाला आहे. या युद्धात आत्तापर्यंत इराणचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. इराणमधील बहुतांश प्रमुख नेत्यांसह प्रमुख लष्करी अधिकारी आणि हजारो नागरिकांना या युद्धात आपला जीव गमवावा लागला. इराणच्या तेल प्रकल्पांना ही मोठी हानी सोसावी लागली आहे. तरीही या युद्धात इराण मागे हटायला तयार नाहीये. या युद्धामुळे संपूर्ण जगाला मोठी झळ पोहोचत आहे. तसेच या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या जागतिक व्यापारालाही अडथळे निर्माण होत असल्याने याचा फटका अनेक देशांना बसत आहे.

अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धात पश्चिम आशिया खंडातील तणाव टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज संबोधन करताना इराणला आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा दिला असून, “इराणला पुन्हा अश्मयुगात धाडू,” अशा शब्दांत विनाशाची धमकी दिली आहे. इराणच्या नवीन अध्यक्षांनी केलेली युद्धविरामाची विनंती ट्रम्प यांनी धुडकावून लावत, कडक अटी समोर ठेवल्या आहेत. याबाबत ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

- Advertisement -

पडसाद : तळे राखील तो पाणी चाखेल, ठीक; पण किती?

तर इराणला अश्मयुगात पोहोचवू
डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत संबोधन करताना म्हंटले आहे, इराणचे नवीन अध्यक्ष जे त्यांच्या पूर्वजांपेक्षा कमी कट्टर आणि अधिक बुद्धिमान आहेत त्यांनी अमेरिकेकडे युद्ध थांबवण्याची विनंती केली आहे. अमेरिका इराणविरुद्धची सर्व लष्करी उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. अमेरिका पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवर पुन्हा जोरदार हल्ला करेल. जर कोणताही करार झाला नाही, तर अमेरिका इराणला पुन्हा अश्मयुगात पोहोचवेल. मात्र, मुख्य उद्दिष्ट पूर्णत्वाच्या जवळ येत असल्याने हा संघर्ष काही कालावधीत संपवला जाऊ शकतो”, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

इराणवर अणुशस्रांच्या बाबतीत कधीही विश्वास ठेवता येणार नाही
“इराणवर अणुशस्रांच्या बाबतीत कधीही विश्वास ठेवता येणार नाही. सध्या अमेरिका आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. अमेरिका आपल्या आखाती मित्र राष्ट्रांना कोणत्याही स्वरूपात हानी पोहोचू देणार नाही”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

इराणची लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात यश
ट्रम्प यांनी असा दावा केला की, “इराणची लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात यश आले आहे. त्यांचे नौदल नष्ट झाले आहे. हवाई दल उध्वस्त झाले आहे आणि त्यांचे नेतृत्वही संपवण्यात आले आहे. प्रमुख संरक्षण कारखाने आणि पायाभूत सुविधा बहुतांशी नष्ट झाल्यामुळे इराणची क्षेपणास्त्र प्रक्षेपण क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे”, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जवळजवळ कोणत्याही तेलाची आयात करत नाही आणि भविष्यातही करणार नाही. आम्हाला त्याची गरज नाही. आम्हाला त्याची कधीच गरज भासली नाही आणि आजही आम्हाला त्याची गरज नाही,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. “जगातील ज्या देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाचा पुरवठा होतो, त्या देशांनी त्या मार्गाची काळजी घेतलीच पाहिजे. त्यांनी त्याचे जतन केलेच पाहिजे. त्यांनी तो मार्ग आपल्या ताब्यात घेतला पाहिजे,” असे म्हणत साथ न देणाऱ्या देशांना इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : भंडारदराच्या पाणी चोरीवर उच्च न्यायालयाचा दणका

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur भंडारदरा धरणाच्या पाणी वाटपात होणारी प्रचंड चोरी आणि नादुरुस्त मोजमाप यंत्रणेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला कठोर शब्दांत फटकारले आहे....