Thursday, May 15, 2025
Homeनाशिकराहुड घाटात चार ते पाच वाहनांचा विचित्र अपघात; २० ते २१ प्रवासी...

राहुड घाटात चार ते पाच वाहनांचा विचित्र अपघात; २० ते २१ प्रवासी जखमी; एका महिलेचा मुत्यू

चांदवड | प्रतिनिधी Chandwad

- Advertisement -

राहुड घाटात आज शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या कंटनेर व पुढे जाणाऱ्या तीन ते चार कार व एक ट्रक व बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात उषा मोहन देवरे वय वर्षे 45 , राहणार भारत नगर, मालेगाव या महिलेचा मुत्यू झाला असून साधारण २० ते २१ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. यावेळी अपघातामुळे वाहतुकीस कोळंबाहून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मदत कार्यास मोठ्या प्रमाणात अडचण होत होती यावेळी 108 रुग्णवाहिका व सोमाटोलची रुग्णवाहिका तसेच टोल च्या अपघात विभागाने मदत कार्य केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते देखील उस्फुर्त पणे मदतीस धावून आले. उपजिल्हा रुग्णालयात जखमी प्रवाशांवर उपचार सुरु आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...