Tuesday, August 18, 2026
HomeनगरCrime News : सोशल मीडियावरील आभासी प्रेम ठरले घातक

Crime News : सोशल मीडियावरील आभासी प्रेम ठरले घातक

विवाहित महिलेवर अत्याचार करून तरूण पसार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात सोशल मीडियाच्या गैरवापरातून एका विवाहित महिलेची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, फेसबुकवरून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरून निर्माण होणार्‍या आभासी नात्यांचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
शहरातील 33 वर्षीय विवाहित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, महिलेचा काही काळापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील राजु भाऊराव काकडे ऊर्फ सुनील पटेल नामक तरूणाशी संपर्क झाला.

- Advertisement -

सुरूवातीला साध्या संवादातून सुरू झालेली ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि पुढे तरूणाने प्रेम व लग्नाचे आश्वासन देत विश्वास संपादन केला, असा फिर्यादीचा आरोप आहे. पीडित महिला विवाहित असून तिला चार मुले आहेत. पती व कुटुंबासोबत राहत असतानाच, फेसबुकवरील सातत्यपूर्ण संवादामुळे संबंधित तरूणावर तिचा विश्वास बसला. त्याने तुझ्याशिवाय राहू शकत नाही असे भावनिक संवाद साधत तिला भेटण्यास प्रवृत्त केले. या विश्वासातूनच महिलेने घरच्यांना काहीही न सांगता त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

1 फेब्रुवारी रोजी रात्री तरूणाने अहिल्यानगरमध्ये आल्याचे सांगून महिलेला भेटीस बोलावले. त्यानंतर दुचाकीवरून तिला छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले. तेथे एका लॉजमध्ये मुक्काम करण्यात आला. लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. घटनेनंतर सकाळच्या सुमारास संबंधित तरूण चहा आणतो असे सांगून महिलेचा मोबाईल घेऊन बाहेर गेला आणि तो पुन्हा परतलाच नाही. बराच वेळ वाट पाहूनही संपर्क न झाल्याने महिला अस्वस्थ झाली. अखेर तिने छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान, तिच्या पतीने कोतवाली पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली. कोतवाली पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर गाठून पीडित महिलेला ताब्यात घेतले व कोतवाली पोलीस ठाण्यात आणले. पीडित महिलेने फिर्याद दिली असून, प्रेम व लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक व अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी राजु काकडे नामक तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 225 रुपये भाव...