Tuesday, February 3, 2026
HomeनगरAccident News : दुचाकी-कंटेनरच्या अपघातात सेवानिवृत्त शिक्षक ठार; तर एक जखमी

Accident News : दुचाकी-कंटेनरच्या अपघातात सेवानिवृत्त शिक्षक ठार; तर एक जखमी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नगर-मनमाड महामार्गावर लागोपाठ दोन दिवसांत तीन अपघात झाले आहे. काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राहुरी खुर्द येथे दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश दत्तू साबळे (वय 68) हे जागीच ठार झाले. तर राहुरी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. रामनाथ डोके हे जखमी झाले.

- Advertisement -

काल सायंकाळी प्रकाश साबळे हे आपले सहकारी शिक्षक डोके यांच्या समवेत कृषी विद्यापीठाहून आपल्या घरी जात असताना राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड रस्ता ओलांडत असताना राहुरीकडून अहिल्यानगरच्या दिशेने जात असलेल्या कंटेनर (आरजे 14 जीटी 0069) ने पाठीमागून जोराची धडक दिली. या आपघातात साबळे व डोके दोघेही रस्त्यावर पडले. साबळे यांच्या अंगावरून कंटेनरचे मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला तर डोके हे जखमी झाले. त्यांना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

YouTube video player

नगर-मनमाड महामार्गावर गेल्या दोन दिवसांत चार अपघात झाले असून चौघांनाही आपले प्राण गमवावे लागले. नगर-मनमाड महामार्गावरील रस्ता अत्यंत धोकादायक असून प्रचंड खड्ड्यांमुळे वाहतुकीस असुरक्षित झाला आहे. मात्र संबधित यंत्रणा कोणतीही दखल घेण्यासाठी तयार नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...