राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वार तरुणाने समोर असलेल्या विजेच्या खांबाला जोराची धडक (Electric Poles Bike Hit) दिल्याने तरुण जागीच ठार (Youth Death) झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना ही राहुरी तालुक्यातील राहुरी- टाकळीमिया रस्त्यावर मियासाहेबबाबा यांच्या पादुका नजीक घडली आहे. मयत तरुणाचे नाव समाधान सिद्धार्थ इसावे (वय 22), रा. सबलखेडा, जि. हिंगोली असे आहे.
समाधान इसावे हा तरुण श्रीरामपूरला (Shrirampur) आपल्या बहिणीकडे भेटायला गेला असल्याचे सांगण्यात आले. समाधान याचा पुढील महिन्यात विवाह ठरविण्यात येणार होता. अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिकेतून या तरुणास राहुरी (Rahuri) येथील ग्रामिण रुग्णालयात आणले. त्यानंतर मयताचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती कळताच मयताची बहीण, भाची व होणारी पत्नी यांनी येऊन मोठा आक्रोश केला.