संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहरातून जाणार्या जुन्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील देना बँकेच्या समोर चारचाकी आणि दुचाकीच्या अपघातातील गंभीर जखमी वृद्धाचा अखेर उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत अज्ञात चारचाकी वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
शशिकांत भानुदास शिंदे (वय 31, रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) हे 15 एप्रिल, 2024 रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच.17, डीए.1628) चिमा लक्ष्मण पवार (वय 74, रा. संजय गांधी नगर, संगमनेर) यांच्यासह जात असताना जुन्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गानजीक असणार्या देना बँकेच्या समोर पाठीमागून येणार्या कारने जोरात धडक दिली. यात शशिकांत शिंदे यांना किरकोळ दुखापत झाली होती, मात्र चिमा पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शशिकांत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात कारचालकावर विविध कलमान्वये शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
अपघातातील जखमी वृद्धाचा उपचार सुरू असताना मृत्यू

ताज्या बातम्या
Nashik News : लोणकर मळा येथे CCTV फुटेजमध्ये दोन बिबट्यांचे दर्शन
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
येथील जयभवानी रोड, लोणकर मळा, नाशिकरोड येथे मध्यरात्री १ वाजता बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले व त्याआधी २० मार्च रोजी...