मुंबई | Mumbai
सातारा जिल्ह्यातील (Satara District) लोणंद-सातारा मुख्य रस्त्यावर (Lonand Satara Road) रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सालपे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू (Death) झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हे सर्व भाविक कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) इचलकरंजी येथून उज्जैन येथे देवदर्शनास निघाले होते. त्यावेळी त्यांच्या ट्रॅव्हल्सला साताऱ्याजवळ अपघात झाला. हा अपघात (Accident) इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चकाचूर झाला. या घटनेची माहिती लोणंद पोलिसांना समजताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, यानंतर जखमींना रुग्णवाहिकेतून सातारा येथील जिल्हा रुग्णालयात (District Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा देकील पडला होता. तर अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर आणि मिनी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अपघातातील मृतांची नावे
या अपघातात ट्रॅव्हल्स चालक सलमान इम्तियाज सय्यद (वय २४), तसेच रजनी संजय दुर्गुळे (वय ४८, रा. पेठ वडगाव, ता. हातकणंगले) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला सातारा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.