Monday, June 24, 2024
Homeनगररेल्वे धडकेत तरुणाचा, तर वाहन धडकेत वृध्दाचा मृत्यू

रेल्वे धडकेत तरुणाचा, तर वाहन धडकेत वृध्दाचा मृत्यू

एमआयडीसी हद्दीत दोन वेगवेगळे अपघात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (2 जून) एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. रेल्वे लाईन क्रॉस करत असताना रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना देहरे (ता. नगर) स्टॅडजवळ रविवारी घडली. प्रदीप रामदास पठारे (वय 32 रा. देहरे) असे मयत तरूणाचे नाव आहे. प्रदीप यांना रेल्वे लाईन क्रॉस करत असताना धडक बसून ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना नातेवाईक नामदेव रंगनाथ पठारे यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.

दरम्यान उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषीत केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बोठे यांनी एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस अंमलदार पितळे करत आहेत. एका 60 वर्षीय अनोळखी वृध्दाचा रविवारी सायंकाळी सह्याद्री चौकात अपघात झाल्याने त्यांना उपचारासाठी सचिन साठे यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. तशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पोले यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली असून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत वृध्दाची ओळख पटली नसून ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या