पुणे | Pune
पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ (Navale Bridge) तीन ते चार गाड्यांची धडक झाल्याने भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात घडला असून, या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून (Highway) जाणाऱ्या भरधाव कंटेनरने दुसऱ्या कंटेनरसह अनेक वाहनांना धडक दिली. यानंतर दोन कंटेनरच्या मध्ये एक कार अडकल्याने तिने पेट घेतला. या कारमधील प्रवाशांसह आणखी काही जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
दरम्यान, अपघातानंतर (Accident) नवले पुलासह महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. सध्या आगीवर (Fire) नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून, मदत व बचाव कार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




