Monday, April 28, 2025
Homeधुळेऔरंगाबाद-शिंदखेडा एस.टी.बसला अपघात ; चालकासह १० प्रवासी जखमी

औरंगाबाद-शिंदखेडा एस.टी.बसला अपघात ; चालकासह १० प्रवासी जखमी

धुळे – प्रतिनिधी dhule

तालुक्यातील गरताड शिवारात भरधाव बस (bus) पुढे चालणार्‍या ट्रकवर धडकून भिषण अपघात (accident) झाला. त्यात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही मात्र चालकासह दहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले.

- Advertisement -

अचानक ट्रक (truck) थांबल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सुरेश नवसुर एकनार, महेंद्र मगन पाटील, निलम तानजी भोसले, राज प्रकाश पाटील, सोनम पाटील, राहुल पाटील, तानाजी भोसले, हिरामण पाटील, हेमंत पाटील, नयन साईराज अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. यातील एक जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

एमएच 20 1854 क्रमाकांची औरंगाबाद-शिंदखेडा (Aurangabad-Shindkheda) ही बस आज दि. 16 रोजी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास धुळ्याकडे येत होती. त्यादरम्यान पुढे सळई घेवून जाणारा ट्रक अचानक थांबल्याने बस ट्रकवर धडकली.

त्यात वरील दहा प्रवासी जखमी झाले. त्यांना तोंडावर, छातीवर, हाताला दुखापत झाली. जखमी प्रवाशांना तत्काळ रूग्णवाहिकेव्दारे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Central Government Decision : केंद्र सरकारचा पाकिस्तानला दणका; १६ यूट्यूब चॅनेलवर...

0
नवी दिल्ली | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताकडून (India) पाकिस्तान विरूद्ध विविध स्तरांवर कारवाई सुरू आहेत. अशातच आता भारत सरकारच्या गृह...