Saturday, May 17, 2025
Homeमहाराष्ट्रपुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, ९ जखमी

पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, ९ जखमी

पुणे | Pune

- Advertisement -

पुणे-नगर महामार्गावर (Pune-Nagar highway) टेम्पो आणि पिकअपची धडक (tempo and pickup) झाल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर ९ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नगरच्या दिशेने येणाऱ्या गाडीला पिकअपला टेम्पोची जोरात धडक बसली. टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने थेट पिकअप गाडीला धडक दिली.

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी, अनेक विद्यार्थ्यी जखमी

अचानक झालेल्या या अपघातात पिकअप मधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. समोरासमोर धडक झाल्याने दोघं वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

पिस्तुलातून गोळ्या घालून प्राध्यापकाची हत्या

पहाटेच्या वेळी हा अपघात झाला असल्यामुळे उपचार मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.=

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत अपघातात नक्की चूक कुणाची याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : दोन लाखासाठी विवाहितेची हत्या

0
गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi नेवासा (Newasa) तालुक्यातील माका येथे एका विवाहित महिलेचा गळा आवळून खून (Married Woman Murder) झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी...