Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातील अपघाताचा थरारक VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, “देव तारी त्याला कोण मारी!”

पुण्यातील अपघाताचा थरारक VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, “देव तारी त्याला कोण मारी!”

पुणे । Pune

देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण मराठीत प्रसिद्ध आहे मात्र, याच म्हणीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर (Sinhagad Road) सिमेंट ट्रकनं एका महिलेला उडवलं आहे, या अपघातामध्ये ही महिला जखमी झाली आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सिंहगड रोडवर असणाऱ्या रोहन कृतिका सोसायटीच्या समोर हा अपघात झाला. विशेष म्हणजे एवढ्या भीषण अपघातानंतर देखील ही महिला जागेवर उठून बसल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

पुणे हादरलं! ACP कडून पत्नी अन् पुतण्याची हत्या, स्वतःलाही संपवलं… कारण काय?

सिंहगड रोडवर असणाऱ्या रोहन कृतिका सोसायटीच्या समोर एक सिग्नल आहे. हा सिग्नल ओलांडताना सिमेंट ट्रकने एका महिलेला चिरडलं आहे. सिग्नल सुटण्याच्या वेळेसच ही महिला झेब्रा क्रॉसिंगवरून जात होती. त्याचवेळी महिला सिमेंट ट्रक खाली आली. रस्ता ओलांडणारी महिला सिमेंट ट्रक चालकाला दिसली नाही. त्यानंतर सिमेंट ट्रक महिलेच्या पायावरुन गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये समोर आले. डंपर पुढे निघून गेल्यानंतर जखमी महिला जागेवर उठून बसली. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी जखमी महिलेला रस्त्याच्या बाजूला आणलं. जखमी महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सिमेंट ट्रक गेल्याने महिला विव्हळत रस्त्यावर पडली होती. अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी महिलेला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला आहे. महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत. या संदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या