पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पुणे-आहिल्यानगर महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात आयसर टेम्पाने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले, मयत माधुरी अरुण नगरे (वय 51) रा. बारामती त्यांच्या मुलीसह गुरुवारी दुपारी दुचाकी गाडीवरुन पुणे अहिल्यानगर महामार्गावरुन शिरुरकडून सुप्याच्या दिशेने येत असतांना नारायणगव्हाण शिवारात पाठीमागून शिरुरच्या दिशेने आलेल्या टेम्पोने दुचाकीवरील मायलेकीच्या दुचाकीस धडक दिली व त्यानंतर टेम्पो चालक गाडीसह घेऊन निघून गेला.
या अपघातात दोघी मायलेकी दोघीही गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी दोघींना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता माधुरी नगरे याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले, तर मुलीवर उपचार सुरू आहे. सुपा पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.




