Monday, June 24, 2024
Homeनगरकरंजी घाटात ट्रक-दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

करंजी घाटात ट्रक-दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

पाथर्डी | Pathardi

- Advertisement -

कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी घाटात भीषण अपघात. ट्रक आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहन चालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहे. शिवाजी नानासाहेब भवार (रा. निवडूंगे ता. पाथर्डी) व जावेद शेख (रा. विहामांडवा ता. पैठण) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ऋषिकेश मोटकर व गणेश गाभूर हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगरमधून (Ahmednagar) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कल्याण-निर्मळ महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात रात्री उशिरा साडेबारा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि दुध टँकरचा भीषण अपघात झाला. अपघात झालेला ट्रक पैठणवरुन शेंगदाण्याचे कट्टे घेऊन नगरकडे चालला होता. तर दुधाचा रिकामा टँकर करंजीकडे येत होता. दोन्ही वाहने करंजी घाटात आली असता समोरा-समोर धड झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्हीही वाहनांचा अक्षरशः चक्काकूर झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या