Saturday, May 18, 2024
Homeजळगावबेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी आरोपीस अटक

बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी आरोपीस अटक

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील बळीराम पेठेत बेकायदेशीर गावठी पिस्तूलासह तीन जिवंत काडतूस, धारदार शास्त्रासह फिरणार्‍या संशयित आरोपीस शनिवारी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आरोपीविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, शहरात शस्त्र बाळगणाया गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळीराम पेठेमधील संशयित आरोपी विलास मुधकर लोट (वय-40) यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहम यांना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी आज सायंकाळी संशयित आरोपी विलास लोट याच्या घराची झाडाझडती घेतली असता 5 हजार रूपये किमतीचे गावठी पिस्तूल, 1 हजार 500 रूपये किंमतीचे जिवंत काडतूस, 500 रुपये किंमतीचा कोयता, आणि प्रत्येकी 1 हजार रूपये किमतीचे दोन गुप्त्या असा साठा आढळून आला.

बेकायदेशीर व विनापरवाना शास्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपी विलास लोट यास अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि जगदीश निकम करीत आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली शनीपेठ पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशन यांनी ही संयुक्त कारवाई केली.

यात शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, पोहेकॉ विजय निकुभ, महेंद्र पाटील, गणेश पाटील, किरण पाटील, रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंदाटे, व महिला पोलीस शिपाई अल्का मोरे आणि शनिपेठ पोलीस ठाण्याचे पो.काँ. दिनेशसिंग पाटील, अभिजित सैंदाणे, किरण बानखेड़े, अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे, राहुल पाटील या दोन पथकांनी ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या