Friday, September 20, 2024
Homeक्राईमNashik News : शहर आयुक्तालय हद्दीतील ४२५ टवाळखोरांवर कारवाई

Nashik News : शहर आयुक्तालय हद्दीतील ४२५ टवाळखोरांवर कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शहरातील वाढती गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर आयुक्तालय हददीमध्ये (City Commissionerate limits) कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी टवाळखोरांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये आयुक्तालय हद्दीतील ४२५ टवाळखोरांविरोधात (Miscreants) प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) नुकतीच मतदान (Poling) प्रक्रिया पार पडली असून, येत्या ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर, मागील काही दिवसांमध्ये शहरात सातत्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांवर टीकेची झोडही उठली आहे. तसेच, दहावी-बारावी परीक्षांचे निकाल जाहीर होऊन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे, उद्यानांमध्ये रात्री-बेरात्री टवाळखोरांकडून उपद्रव करून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालय हद्दीमध्ये टवाळखोरांविरोधात धडक कारवाई (Action) करण्याचे आदेश दिले.

हे देखील वाचा : Nashik News : पेठमधील वांगणी शिवारात लाखोंचा गुटखा जप्त

त्यानुसार, परिमंडळ एकमधील आडगाव, पंचवटी, म्हसरुळ, भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा, गंगापूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १९० टवाळखोर आणि तर, परिमंडळ दोनमधील अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यासह चुंचाळे पोलीस चौकी या हद्दीत २३५ टवाळखोर अशा ४२५ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी (Police) अचानक राबविलेल्या या कारवाईमुळे रात्रीच्यावेळी उपद्रव माजविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या