Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNashik MC Election : पोलिसांचा खडा पहारा; बाहेरुन अठराशे होमगार्ड, नऊशे अतिरिक्त...

Nashik MC Election : पोलिसांचा खडा पहारा; बाहेरुन अठराशे होमगार्ड, नऊशे अतिरिक्त अंमलदार मिळणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका निवडणुकीच्या मतदानाला (Mahapalika Election Voting) अवघे सात दिवस शिल्लक राहिल्याने शहर पोलीस आयुक्तालयाने बंदोबस्ताचे सविस्तर नियोजन पूर्ण केले आहे. मागील निवडणुकांतील अनुभव, सध्याच्या प्रचारातील तणावपूर्ण वातावरण आणि काही संवेदनशील भागांचा विचार करून यंदा कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून, शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर (Voting Centre) पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे.

- Advertisement -

महापालिका निवडणुकीसाठी १५ तारखेला मतदान होणार असून, प्रचार अंतिम टप्प्यात आहे. सिडको, पंचवटी, जुने नाशिक परिसरात काही उमेदवारांचे प्रचारादरम्यान वाद निर्माण झाले असून, भद्रकालीसह काही ठिकाणे यापूर्वीही संवेदनशील उरली आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, विशेष शाखेने मतदान व मतमोजणीसाठीचा बंदोबस्त आराखडा अंतिम केला आहे.

हे देखील वाचा : Nashik Municipal Corporation Election : ‘वारसां’ना किती मिळणार मतदारांची ‘पसंती’?

विशेष शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिटके (Sandeep Mitke) यांनी स्थानिक पोलीस, अतिरिक्त मनुष्यबळ आणि बाहेरून आलेल्या कुमकेनुसार बंदोबस्त नेमण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्राच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून, गरजेनुसार बंदोबस्त तैनात असेल. दरम्यान, उपायुक्त मोनिका राऊत व किशोर काळे यांनी दोन्ही परिमंडळांतील मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

मतदान केंद्रांच्या बाहेर शंभर मीटर परिसरात जमावबंदी, वाहन नियमन आणि संशयित हालचालीवर लक ठेवण्याची जबाबदारी उपायुक्त किरिथका सी. एम. आणि सहाय्यक आयुक्त अद्विता शिंदे यांच्या पथकाकडे सोपवण्यात आली आहे. तसेच, ‘स्ट्रॉगरूम’ परिसरात स्वतंत्र वाहतूक व सुख्क्षा नियोजन राबवले जाणार आहे. भद्रकाली परिसर हा यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळी वादग्रस्त उरला होता. सन २०२५ च्या लोकसभा निवडणुकीत एका मतदान केंद्राबाहेर दोन राजकीय गटांत तणाव निर्माण झाला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यानही काही ठिकाणी किरकोळ संघर्ष झाले. यंदा अर्ज नोंदणीपासून माधारीपर्यंत राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाल्याने, या भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात असणार आहे.

हे देखील वाचा : Nashik News : ‘स्ट्राँगरूम’ भोवती सशस्त्र कवच; मतदान-मतमोजणीदरम्यान त्रिस्तरीय सुरक्षा

आयुक्तालयाची कुमक

विशेष पोलीस महानिरीक्षक (आयुक्त दर्जा) : १
उपायुक्त ते पोलीस निरीक्षक : ७३
सहारयक ते उपनिरीक्षक : २०३
सहाय्यक उपनिरीक्षक ते अंमलदार ३.०३६
विशेष शाखा, गुन्हे शाखा (१ व २), अंबड व नाशिकरोड विभाग
अमली पदार्थ विरोधी व गुंडा विरोधी पथके
जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक
बॉम्बशोधक व नाशक पथक, दामिनी मार्शल्स

अतिरिक्त कुमक

९०० पोलीस अधिकारी व कर्मचारी
गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) १,८०० जवान
राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) तुकडी

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही...

0
नाशिक | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे (शिंदे...