Tuesday, May 28, 2024
Homeनाशिकवडाळा गावात जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई 

वडाळा गावात जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई 

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar 

सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर  इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकोंसत्तर  69 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

 पोलिसांकडून  मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा गावातील मरी माता मंदिराच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत झाडाच्या आडोशाला काही इसम जुगार  खेळत असल्याचे पोलिसांना खबर  मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी तेथे गेले असता रमेश नारायण खोडे, भावूराव बाळू बत्तीसे, नवनाथ अर्जुन मोरे, असलम फरिन शेख, नाविद  हैदर पठाण, अझरुद्दीन शेख नमुद्दीन (सर्व रा. वडाळा गाव) मोईन शेख  युसुफ शेख (रा. भारत नगर) रिजवान शेख फत्ते मोहम्मद (रा. गणेश नगर), नवाझ  शेख फकीर मोहम्मद (रा. गुलशन नगर)  पियुष बंडू सावंत (रा. राजीव नगर), इम्रान नवाब शहा, (रा. सादिक नगर) इमरान सलीम शहा (रा. भारत नगर) यांना हे पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळताना पोलिसांना मिळून आले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी पोलिसांनी या सर्वांवर कारवाई करून मोबाईल फोन, चार मोटरसायकल असा 69 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 12 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या