निफाड | प्रतिनिधी | Niphad
निफाड उबाठा शिवसेनेला (Shivsena UBT) खिंडार पडून पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा निफाड पंचायत समिती माजी सभापती राजेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील ,उबाठा तालुकाध्यक्ष सुधीर कराड यांनी आज ठाणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याप्रमुख उपस्थितीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे सह संपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे ,निफाड नगरपंचायत उपनगराध्यक्ष तथा निफाड शिवसेना तालुकाध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश सोहळा शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची घोषणा सुधीर कराड यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी वेगळी शिवसेना (Shivsena) स्थापन केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातून शिंदे मुख्यमंत्री होण्याअगोदर त्यांना पाठिंबा देण्यासाठी व शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून सर्वप्रथम निफाड नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व १० नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा देत अनिल पाटील कुंदे व राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला होता. त्यानंतर दोन अडीच वर्ष सत्तेत असतानाही निफाड तालुक्यातील शिवसेनेत पक्षप्रवेश झाला नसल्याने निफाड तालुक्यातील पक्षाची पूर्ण जबाबदारी शिवसेना निफाड तालुकाध्यक्ष या नात्याने अनिल पाटील कुंदे हे सांभाळत होते लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या शिवसेनेच्या प्रचंड यशामुळे शिवसेनेत इनकमिंगचे वारे वाढले आहे.
आज निफाड तालुक्यातून (Niphad Taluka) त्याची सुरुवात होऊन उबाटा उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा निफाड पंचायत समिती माजी सभापती राजेश पाटील, उबाटा शिवसेना निफाड तालुकाध्यक्ष सुधीर कराड यांनी उबाटा शिवसेनेचा त्याग करत अनिल पाटील कुंदे व राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार असलेल्या शिवसेनेत पक्षप्रवेश शेकडो समर्थक व शिवसैनिकांच्या उपस्थितीत करणार असल्याने माजी आमदार अनिल कदम यांच्यासह उबाटा शिवसेनेला निफाड तालुक्यात हा जोरदार धक्का मानला जात आहे.
दरम्यान, तालुक्यातील (Taluka) अनेक वेगवेगळ्या पक्षातील राजकीय पदाधिकारी व मान्यवर शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु योग्य वेळी योग्य ठिकाणी त्या राजकीय पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश शिवसेनेत देण्यात येणार आहे .तोपर्यंत त्यांना वेट अँड वॉच ची भूमिका करण्याची विंनती अनिल पाटील कुंदे यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.