Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याजेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन; मराठी सिनेविश्वावर शोककळा

जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन; मराठी सिनेविश्वावर शोककळा

मुंबई | Mumbai

मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांचं निधन (Actor Atul Parchure Passed Away) झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला. अतुल परचुरे (Atul Parchure) यांनी कॅन्सरशी (Cancer) लढा दिला होता. कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले होते. अतुल परचुरे यांनी हिंदीत कपील शर्मा शो मध्ये देखील काम केले होते. त्यांच्या या कामाला देखील लोकांची चांगली पसंती मिळाली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...