मुंबई | Mumbai
काँग्रेस पक्षाच्या “मत चोरी” विरोधातील मोहिमेचे समर्थन करतानाचा एक कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर अभिनेता के. के. मेनन यांनी काँग्रेस पक्षाच्या “व्होट चोरी” विरोधातील मोहिमेत कोणतीही भूमिका नसल्याचे ठामपणे सांगितले आहे. काँग्रेसने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ‘Special Ops’मधील हिम्मत सिंह, म्हणजेच अभिनेता केके मेनन काँग्रेसच्या ‘व्होट चोरी’ कँपेनचा प्रचार करताना दिसतोय. मात्र, हा व्हिडिओ एडीट केलाला असल्याचे समोर आले आहे. स्वतः केके मेनन याने या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
यासंदर्भात के. के. मेनन म्हणाले की, त्यांनी असा कोणताही व्हिडिओ शेअर केलेला नाही. त्यांची क्लिप परवानगीशिवाय वापरण्यात आली आहे. ही क्लिप काँग्रेसच्या ‘मत चोरी’ मोहिमेतील आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला के. के. मेनन लोकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. हे पाहून असे वाटते की, त्यांनी काँग्रेसच्या या जाहिरातीत अभिनय केला आहे.
व्हिडीओत नेमके काय म्हंटले आहे?
काँग्रेसने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये केके मेनन म्हणतो, थांबा थांबा स्क्रोल करू नका. तुम्ही ही रील पाहत असाल, तर याचा अर्थ काय? यानंतर, व्हिडिओमध्ये दुसरा व्यक्ती दिसतो, जो मत चोरीविरुद्धच्या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करतो. दरम्यान, केके मेनन यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांनी अशा कोणत्याही मोहिमेत भाग घेतला नाही.
केके मेननचे स्पष्टीकरण
काँग्रेसच्या या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना केके मेनन म्हणाला की, “मी या जाहिरातीत काम केलेले नाही. माझी स्पेशल ऑप्स वेब सीरिजची क्लिप परवानगीशिवाय एडीट करुन वापरण्यात आली आहे.” आता त्याच्या स्पष्टीकरणावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रियाही येत आहेत.
मत चोरी विरोधातील मोहिम काय आहे?
काही दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेत आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विविध राज्यांतील विधानसभा निवडणूकीत झाल्याचे म्हणात मतचोरीचे आरोप केले होते. यानंतर काँग्रेस पक्षाने एक वेब पेज सुरू केले आहे आणि मत चोरीची निवडणूक आयोगाने जबाबदारी घ्यावी असे म्हटले आहे. या व्हिडिओमध्येही पक्ष नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




