अमळनेर । प्रतिनिधी
अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार प्रचार हाती घेतला. सानेगुरुजी हायस्कूलच्या पटांगणात झालेल्या जाहीर सभेत सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांची उपस्थिती होती. त्यांनी एक स्पष्ट संदेश दिला की, एकीकडे बदमाश आहेत तर दुसरीकडे बाणेदार! या वाक्याने सभेची सुरुवात झाली आणि उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. यामध्ये डॉ.अनिल नथ्थू शिंदे यांच्या समर्थनातील त्यांच्या प्रचाराची महत्त्वाची चर्चा झाली.
किरण माने यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सूचक केले की, भाजपने ईडी, सिबीआयच्या नावावर राज्यात पक्षांना फोडले आहे, आणि हे एक कटकारस्थान आहे. दीड वर्षांतील महागाई, बलात्कार, आणि भ्रष्टाचाराच्या वाढती घटनांमुळे जनता संतापली आहे, त्यांनी भाजपावर हल्ला केला.
मंचावर उपस्थित असलेल्या पार्टीच्या इतर नेत्यांनीही मत व्यक्त केले. प्रा.अशोक पवार, अॅड ललिता पाटील, संदीप घोरपडे, प्रा.सुभाष पाटील, धनगर दला पाटील, जुगल प्रजापती सह अनेकांनी आपल्या विचारांनी सभा दणाणून टाकली.व विरोधी उमेदवार यांचा बुरखा फाडला.
यामध्ये खास करून, डॉ. अनिल शिंदे हे उच्च शिक्षीत व विश्वास ठेवल्यासारखे उमेदवार आहेत, असे विचार व्यक्त केले.
मंत्री अनिल पाटील आणि अपक्ष उमेदवारांवर तिखट टिप्पण्या केल्या. मंत्री पाटील यांच्यावर नेहमीची खोटे बोलणे, गटबाजी व भ्रष्टाचाराचे आरोप असतात, असे प्रा.सुभाष पाटील यांनी सांगितले. प्रा.अशोक पवार, अॅड.ललिता पाटील, धनगर दला, निळकंठ पाटील यांच्यासोबतच, गोवींदराव पाटील यांनीही विद्यमान सरकारच्या धोरणांवर सवाल केला.