Wednesday, March 26, 2025
Homeमनोरंजनऋषि कपूर यांचे लहान बंधू राजीव यांचे निधन

ऋषि कपूर यांचे लहान बंधू राजीव यांचे निधन

मुंबई :

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक राजीव कपूर (वय ५८) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे छोटे बंधू आहेत. राम तेरी गंगा मैली या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती.

- Advertisement -

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेंबूरमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्याठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. एक जान है हम या चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. आ अब लौट चले, प्रेम ग्रंथ व हिना चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती.

गेल्यावर्षी निधन झालेल्या ऋषी कपूर यांच्या कुटुंबाला मंगळवारी आणखी एक धक्का बसला. मंगळवारी सकाळी राजीव कपूर यांचा दिवस खूप चांगला सुरू झाला. मात्र नाष्टा झाल्यानंतर त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागलं. कुणाला सांगेपर्यंत त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

रणधीर कपूर यांनी खूप धक्क्यात असताना ही माहिती दिली. ‘मी माझा सर्वात लहान भाऊ राजीवला गमावलं आहे. डॉक्टरांनी खूप मेहनत केली पण त्यांना वाचवू शकले नाहीत.’

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

एसटी महामंडळाच्या बसेस पर्यावरणपूरक इंधनावर परावर्तीत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai एसटी महामंडळाच्या सर्व बसेस पर्यावरणपूरक इंधनावर परावर्तीत करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक आणि एलएनजी...