Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPrajakta Mali : आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मोठा...

Prajakta Mali : आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

सध्या संपूर्ण राज्यामध्ये बीडच्या (Beed) केज तालुक्यातील (Kej Taluka) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे. भाजप नेते आणि आष्टीचे आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी हा विषय लावून धरला असून ते रोज माध्यमांशी बोलताना अनेक गौप्यस्फोट करत आहेत. काल माध्यमांशी बोलतांना त्यांनी बीडमध्ये होत असलेल्या सिने अभिनेत्रींच्या कार्यक्रमांचा दाखला देत इव्हेंट पॉलिटिक्स सुरु असल्याचे म्हटले होते. यावेळी धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा देखील उल्लेख केला होता. त्यानंतर आता अभिनेत्री प्राजक्ता माळी आमदार सुरेश धस यांच्याविरोधात कठोर पाऊल उचलणार असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

आमदार सुरेश धस यांनी काल (दि.२७) रोजी माध्यमांशी बोलतांना बीडमध्ये आम्ही बघत असतो रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी, सपना चौधरी यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचे शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा. त्याचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे, असे म्हणत त्यांनी मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांना टोला लगावला होता. त्यानंतर आता धस यांच्या वक्तव्यावर अभिनेत्री प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali) हिने आक्षेप घेतला आहे. प्राजक्ता माळी या प्रकरणी महिला आयोगात तक्रार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोग या प्रकरणात सुरेश धस यांच्यावर काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

YouTube video player

तसेच आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी पत्रकार परिषद (Press Conference) घेत उत्तर देणारं आहे. तिने म्हटले अये की, “माझी भूमिका मी पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांसमोर मांडणार आहे.मात्र, पत्रकार परिषदेची वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. दुसरीकडे प्राजक्ता माळी थेट पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतील. उलटसुलट सुरु असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळेल. प्राजक्ता माळी ही सर्वसामान्य मराठी कुटुंबातून पुढे आलेली मराठी अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तिला सोशल मीडियावरुन सातत्याने ट्रोल केले जात आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपुरातील वार्ड नं.1 इराणी गल्ली परिसरात शासकीय कर्तव्यावर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्याची, जमावाला भडकावून आरोपी सोडवण्याची आणि कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न...