Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik-Dindori Constituency 2024 : मतमोजणीची लगीनघाई; प्रशासनाची लगबग सुरु

Nashik-Dindori Constituency 2024 : मतमोजणीची लगीनघाई; प्रशासनाची लगबग सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मतदान (Voting) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रशासनाद्वारे नव्याने मतमोजणी (Counting of Votes) प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून, मतमोजणीसाठी लागणारे मनुष्यबळ, त्या अनुषंगाने लागणान्या तयारीच्या कामाने वेग घेतला आहे.

- Advertisement -

नाशिक व दिंडोरी लोकसभा (Nashik and Dindori Loksabha) मतदारसंघातील दुर्गम भागातून मतपेट्या गोळा होण्याच्या प्रक्रियेला वेळ लागल्याने मतपेट्या संकलन करून केंद्र सीलबंद करण्यास दुपार उजाडली होती. अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्र जागून काढावी लागली होती. या पार्श्वभूमीवर काल सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा गजबजले होते. काल दिवसभर मतमोजणीसाठीचे नियोजन करण्यात अधिकारी व्यस्त असल्याचे चित्र होते.

एकावेळी ८४ मतपेट्यांची मोजणी

नाशिक लोकसभेसाठी १९१० तर दिंडोरी लोकसभेसांठी १९२२ मतपेट्या मतदान केंद्रात ठेवलेल्या होत्या. या मतपेट्यांची मोजणी विधानसभानिहाय केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभेसाठी १४ टेबलवर ४ जणांची नियुक्त केली जाणार आहे. त्यात एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक, एक मायक्रो ऑब्झरवर व एक कर्मचारी राहणार आहे. त्यासोबतच पोस्टल मतदानाच्या मोजणीसाठी देखील १० टेबलच्या माध्यमातून ३० जणांची नेमणूक केली जाणार आहे. त्यात एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक, एक मायक्रो ऑब्झरवर यांचा समावेश राहणार आहे.

एक हजार कर्मचार्‍यांद्वारे मतमोजणी

नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सकाळी ७ वाजता प्रारंभ केला जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघात ४८५ अधिकारी व कर्मचार्‍यांचा सहभाग राहणार आहे. त्या व्यतिरिक्तचे व्यवस्थापन व नियोजन अधिकार्‍यांची संख्या गृहीत धरुन दोन्ही मतदारसंघात एक हजार मनुष्यबळाची गरज पडणार आहे. त्यादृष्टीने नियोजन केले जात असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले.

दिंडोरीचा निकाल लवकर लागणार

दिंडोरी व नाशिक लोकसभा मतमोजणी एकाच वेळी सुरु करण्यात येणार आहे. दिंडोरीसाठी १९२२ मतपेट्यांची मोजणी केली जाणार आहे. तर नाशिकसाठी १९१० मतपेट्यांची मोजणी केली जाणार आहे. मतमोजणी दरम्यान नाशिकसाठीच्या नोटा मतांसह एकूण ३२ मतांची गोळा बेरीज करुन त्यांचा ताळमेळ तपासावा लागणार आहे. तर दिंडोरीत नोटासह केवळ ११ मतांचा ताळमेळ करावा लागणार असल्याने दिंडोरीचा निकाल दुपारपर्यंत लागण्याची शक्यता आहे. तर नाशिकचा निकाल सायंकाळपर्यंत लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निहाय मतमोजणीच्या फेर्‍या (नाशिक लोकसभा)

नाशिक लोकसभाईव्हीएम फेऱ्या
सिन्नर३२१ २३
नाशिक पूर्व३२६२४
नाशिक मध्य२९५ २२
नाशिक पश्चिम४१० ३०
देवळाली२६९ २०
इगतपुरी २८९ २१

विधानसभा निहाय मतमोजणीच्या फेर्‍या (दिंडोरी लोकसभा)

दिंडोरी लोकसभाईव्हीएम फेऱ्या
नांदगाव३३१ २४
कळवण१४५ २५
चांदवड२९६ २२
येवला३२० २३
निफाड२७३ २०
दिंडोरी ३५७ २६

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या