Monday, June 17, 2024
Homeधुळेप्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय 20 टेबलवर होणार मतमोजणी

प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय 20 टेबलवर होणार मतमोजणी

धुळे – dhule प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 02- धुळे लोकसभा मतदार संघासाठी मंगळवार दि.4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून शासकीय गोदाम, नगावबारी, देवपूर, धुळे येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.

- Advertisement -

02- धुळे लोकसभा मतदार संघासाठी 20 मे रोजी मतदान पार पडले. या मतदार संघात नाशिक जिल्ह्य़ातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण या तीन विधानसभा मतदार संघाचा तर धुळे जिल्ह्य़ातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा या तीन असे एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

धुळे लोकसभा मतदार संघाच्या
मतमोजणीसाठी धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या विधानसभा मतदार संघनिहाय प्रत्येकी 20 असे एकूण 120 टेबलवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक व मदतनीस म्हणून 14 अधिकारी, 12 रो अधिकारी तर रो अधिकाऱ्यांना सहायक व नियंत्रणासाठी 12 कर्मचारी नियुक्त केले आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 15 पथक प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांना सहाय्यसाठी 51 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

धुळे लोकसभा मतदार संघाची मतमोजणीची प्रक्रिया सरासरी 17 फेरीत पूर्ण होईल. यात धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी 19, धुळे शहर 15, शिंदखेडा 17, तर मालेगाव बाह्य 17, मालेगाव मध्यकरीता 18, तर बागलाण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीकरीता 15 फेऱ्या होतील. मतमोजणीची अद्ययावत माहिती भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होवू शकेल. मतमोजणी केंद्राबाहेर माध्यम प्रतिनिधींसाठी मिडीया कक्ष, तर उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी कम्युनिकेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत. मिडीया कक्षात भारत निवडणूक आयोगामार्फत पासेस देण्यात आलेल्या प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येणार आहेत.

मतमोजणी केंद्रांत मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्रात कोणीही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू नयेत, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांचे मोबाईल ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहेत.
असेही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या