Saturday, May 4, 2024
Homeनाशिककादवाच्या इथेनॉल प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

कादवाच्या इथेनॉल प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

ओझे l Oze (वार्ताहर)

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या प्रस्तावित आसवणी व इथेनॉल प्रकल्पास साखर आयुक्त यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच कादवाचे इथेनॉल प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल अशी माहिती कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.

- Advertisement -

देशात अतिरिक्त साखर निर्मितीमुळे केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देत नवीन प्रकल्पासाठी प्रकल्प कर्जावरील व्याजात 50 टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले आहे इथेनॉल चे दर वाढवले आहे.

कादवा नेही इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला होता त्यास केंद्राने यापूर्वीच मंजुरी दिली होती .महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नुकतीच जनसुनावणी होत ती ही परवानगी मिळाली आहे. सदर प्रस्तावित प्रकल्पास पुणे येथील साखर आयुक्त यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

कादवा कारखान्याने सदर प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी ठेवी देण्याचे आवाहन गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी केले होते त्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता लवकरच सदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. आधुनिकीकरण झाल्याने गाळप कार्यक्षमता वाढली आहे.

15 दिवसात 38876 मेंटन उसाचे गाळप झाले असून मंगळवार दि.10 रोजी 3003 मेंटन विक्रमी गाळप झाले होते.यंदा जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कादवा कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होत असून सुधारित ऊस जातींचे लागवड व शेतकरी आधुनिक पद्धतीने नियोजन करत असल्याने एकरी उत्पादन वाढत आहे.

त्यामुळे भविष्यात ऊस वाढणार आहे थेट रसापासून इथेनॉल निर्मिती करता येणार असल्याने कादवा ला इथेनॉल प्रकल्प चालविण्यास कोणतीही अडचण येणार नाही. कादवाची यावर्षीही उत्तर महाराष्टात उसाची एफआरपी सर्वाधिक असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव यांनी केले आहे यावेळी सर्व संचालक अधिकारी उपस्थित होते.

कादवा कामगारांना 19 टक्के दिवाळी बोनस

कादवा सहकारी साखर कारखान्याने कामगारांना यंदा 19 टक्के दिवाळी बोनस दिला असून कामगार युनियन अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे व सर्व पदाधिकारी यांनी संचालक मंडळ व प्रशासनाचे आभार मानले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या