Sunday, October 13, 2024
HomeUncategorized#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१

A  Social awareness initiative of the Nasik Obstetrics and Gynaecology Society

किशोर अवस्था हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा व वेगळा टप्पा का आहे?

- Advertisement -

डॉ. स्वप्ना कुलकर्णी.स्त्रीरोग तज्ञ

किशोर अवस्था हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा व वेगळा टप्पा का आहे? मानवी जीवनातील विविध टप्प्यांकडे जेव्हा आपण बघतो -बालअवस्था, किशोरअवस्था, तारुण्य आणि वार्धक्य तेव्हा हे लक्षात येते की किशोर अवस्था हा शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने खूप महत्त्वाचा टप्पा आहे. कारण ह्या वयात घडणाऱ्या सर्वच चांगल्या वाईट घटनांचे परिणाम हे दीर्घकालीन असतात.

या काळात शारीरिक व मानसिक विकास हा अतिउच्चवेगाने होतो तसेच हा अत्यंत संवेदनशील कालखंड आहे.क्षमतांचा पूर्णपणे विकास झालेला नसतो पण बंडखोरपणा वाढलेला असतो त्यामुळे भरकटण्याचा धोका अधिक असतो याबरोबरच उत्तम जीवनशैली अंगीकरणासाठी आवश्यक असणारे ज्ञान मिळवण्याचा, भावनिक समृद्ध होण्याचा व परंपराशी उत्तम नाते संबंध जोडण्यास शिकण्याचा कालावधी म्हणजे किशोरअवस्था.

सर्वप्रथम पाहूया यात होणारे शारीरिक बदल. साधारणता नऊ ते दहा वर्षापासून सुरू होतात

मुलीं मधील शारीरिक बदल.

१. स्तनांची वाढ होण्यास सुरुवात होते

२. गुप्तअंगावर केस येतात.

३. अचानक उंची वाढते.

४. मासिक पाळी सुरू होते.

५. कमरेचा भाग रुंदावतो.

मुलांमध्ये होणारे शारीरिक बदल.

१. अंडकोशाचा आकार वाढतो.

२. जनेंद्रियावर केस येण्यास सुरुवात होते.

३. शरीराच्या इतर अवयवांपेक्षा हातापायांची वाढ वेगाने होते. अचानक उंची वाढते.

या वयात होणारे भावनिक बदल समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. याचे वर्णन वादळ आणि तणाव या समर्पक शब्दात करता येईल. हा ताण व वादळे नक्की काय आहेत ते पाहूया.

१. पालकांशी मतभेद.

पालक अथवा शिक्षक या अधिकारपदावर असलेल्या व्यक्तींशी वारंवार संघर्ष होतो. या वयात मुलांची स्वातंत्र्याची वाढलेली इच्छा व मुलांचे संरक्षण करण्याची पालकांची इच्छा यातील असमतोलता देखील कारणीभूत आहे. भावनिक जवळीक कमी होते.

२. स्वभावाच्या लहरी (मूडस्विंग्ज)

वारंवार मूड बदल, अधिक नकारात्मक स्वभाव, लाज वाटणे, एकटेपणा या भावना तीव्रतेने येतात. नैराश्य किंवा मानसिक आरोग्याची समस्या काही प्रमाणात चौदाव्या वर्षी सुरु होतात असे आढळून आले आहे. मुख्यतः जी मुले त्यांच्या समवयस्कांमध्ये कमी लोकप्रिय आहेत, शाळेत चांगले काम करत नाहीत किंवा कौटुंबिक कलह जवळून अनुभवतात त्या मुलांमध्ये स्वभावाच्या लहरी जास्त करून दिसून येतात.

३. जोखीम घेण्याची वर्तणूक ( risk taking behaviour)

या वयात संवेदना शोधण्याची व आवेगाची भूक असते .त्यातूनच बेकायदेशीर वर्तणूक आम्लपदार्थसेवन, दारूचेसेवन, धोकादायक डायटिंगव जोखीमपूर्ण लैंगिकसंबंधाच्या आहारीही मुले जातात. सर्व मानसिक बदलांचा संबंध मेंदूतील ग्रंथीमध्ये होणाऱ्या संप्रेरकांशी व लिंबिकासिस्टमशी जोडला गेला आहे.

या बदलांमुळे भावनिक उत्तेजन वाढते, हळूहळू ते नियमन करण्याची क्षमताही विकसित होते. त्यासाठी काय उपायकरायचे

१. स्वतः समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे.

२.परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे.

३. आपल्याकडे कसे पाहतात त्या ऐवजी मजबूत मैत्री विकसित करणे.

ही कौशल्य शिकल्यास आपण यशस्वीपणे या ताणतणाव व वादळाचे नियमन करू शकतो. यामुळे तर्कशक्ती, मूल्य अधिक भक्कम होत जातात. हीच वेळ आहे जेव्हा किशोरवयीन मुले त्यांच्या भविष्याचा गांभीर्याने विचार करू लागतात. त्यांना कोणत्या प्रकारचे करिअर हवे आहे आणि कसे नातेसंबंध हवे आहेत या विषयी त्यांची मते बनतात. या विचारांना हे वादळ व ताणतणाव पूरक देखील असतात.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या