Friday, December 6, 2024
Homeराजकीयतेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ?

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ?

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

माजी महसूलमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी रविवारी जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे भव्य रक्तदान शिबिराप्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खडे बोल सुनावत जोरदार टीका केली होती.

- Advertisement -

या टिकेनंतर माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांनी खडसे यांच्यावर ट्विट करुन तोडीपाणी आणि भ्रष्टाचाराचा उल्लेख करुन जहरी टीका केली आहे.

त्यावर खडसे यांच्या कन्या जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमन अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आक्रमक होतं,तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? असा जोरदार पलटवार केला.

एकनाथराव खडसे यांनी रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले होती की, मी देखील विरोधी पक्षनेता होतो, पण संकटाच्या काळात कधीही असला खेळ खेळला नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही.

सत्ता गेल्यापासून फडणवीस ‘माशा’सारखे तडफडत आहे, असे म्हणत खडसेंनी टीका केली होती. त्यावर भाजपा आमदार सातपुते म्हणाले की, नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्रभाऊ बद्दल बोलत आहात.

विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजींवर बोलण्याअगोदर आरसा बघा,सगळं लक्षात येईल, असे ट्विट करुन टीका केली आहे.

भाजपा आमदार राम सातपुते यांच्या ट्विटरच्या टिकेनंतर खडसे यांच्या कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आक्रमक होत, आमदार सातपुतेंचा चांगलाच समाचार घेतला.

अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन म्हटलं की, आमदार जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिमंत तर सिद्ध करा ना? शामराव फडणविशी मिरची तुम्हला का झोंबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का म्हणून ते गप्प आहेत? असे म्हणत जोरदर हल्लाबोल केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या