Tuesday, February 3, 2026
HomeनगरAMC : जाहिरातबाजी भोवली; विद्रुपीकरण करणार्‍यावर गुन्हा दाखल

AMC : जाहिरातबाजी भोवली; विद्रुपीकरण करणार्‍यावर गुन्हा दाखल

मनपाच्या अधिकार्‍यांची तोफखाना पोलिसात फिर्याद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहराचे सौंदर्य बिघडवणार्‍या आणि ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण करणार्‍यांवर महानगरपालिकेने आता कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सावेडी येथील प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कंपाऊंड भिंतीवर 1 बीएचके, 2 बीएचके भाड्याने मिळेल अशा आशयाचा विनापरवाना जाहिरात फलक लावल्याप्रकरणी एकावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी बाळासाहेब लक्ष्मण पवार (वय 56, रा. बालिकाश्रम रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (31 ऑक्टोबर) दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास पवार आणि त्यांच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला ही बाब निदर्शनास आली. पथकाच्या पाहणीत, छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या लोखंडी ग्रीलवर 21 फुटाचा फ्लेक्स बोर्ड आढळला. त्यावर 1 बीएचके, 2 बीएचके भाड्याने मिळेल असे लिहून मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता हा फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

YouTube video player

पथकाने तात्काळ पंचनामा करून, फोटो काढले आणि सदर विनापरवाना बोर्ड जप्त केला. वरिष्ठांच्या सूचनेवरून बाळासाहेब पवार यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून, सदर मोबाईल क्रमांक धारक अनोळखी व्यक्तीविरोधात महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम 1995 च्या कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार खंडागळे करत आहेत.

ताज्या बातम्या

प्रफुल्ल

Praful Patel: राष्ट्रीय नेता निवडीपासून ते पक्षाचे विलिनीकरण, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच...

0
मुंबई | Mumbaiमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्त्वाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा...