Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशइस्रायली संरक्षण मंत्र्यांचा मोठा दावा; म्हणाले, १६ वर्षानंतर हमासने गाझावरील नियंत्रण गमावले

इस्रायली संरक्षण मंत्र्यांचा मोठा दावा; म्हणाले, १६ वर्षानंतर हमासने गाझावरील नियंत्रण गमावले

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

गाझापट्टीत (Gaza Stip) इस्रायल आणि हमास यांच्यात (Israel & Hamas War) गेल्या ३९ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांनी युद्धबंदीचे आंतरराष्ट्रीय समुदायाचे आवाहन पुन्हा धुडकावून लावले असून, ओलिसांची सुटका होईपर्यंत लढाई सुरूच ठेवण्याचा पुनरुच्चार केला आहे. दरम्यान, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी मोठे विधान केले आहे.

- Advertisement -

इस्रायल सैन्याने हमासच्या संसदेवर ताबा मिळवला असून, त्याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यानंतर आता हमासने गाझापट्टीवरील नियंत्रण गमावले आहे, असा दावा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केला आहे. यासोबतच पुढे ते असे ही म्हणाले की, हमासचा गाझावर १६ वर्षांपासून ताबा होता. पण, हमासने आता गाझापट्टीवरील नियंत्रण गमावले आहे. हमासचे दहशतवादी पळ काढत आहेत. हमासचे तळ नागरिकांनी उद्ध्वस्त केले आहेत. नागरिक हमासच्या तळांना लक्ष्य करून लूटमार करत आहेत. गाझातील नागरिकांचा सरकारवर विश्वास नाही, असा दावा संरक्षणमंत्र्यांनी केला आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी १२ कोटीची शिष्यवृत्ती मंजूर; परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा

गाझाचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या अल-शिफा काही दिवसांपासून युद्धाचे केंद्र बनले आहे. इस्रायलने या हॉस्पिटलवर हल्ला केल्याचा आरोप हमासने केला आहे. पण इस्रायली लष्कराने रुग्णालयाच्या आसपास हमासच्या दहशतवाद्यांवर लक्ष्य करत असल्याचा दावा केला आहे. अल-शिफा या गाझाचे सर्वात मोठे रुग्णालयामध्ये हमास कमांड सेंटर चालवत असल्याचा दावा इस्रायल लष्कराने केला आहे.

वडेट्टीवारांना मिळालेल्या धमकीची गृहविभागाकडून गंभीर दखल; धमकी देणाऱ्यांवर होणार कारवाई

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धात सहभागी झालेल्या लष्कराच्या जवानांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवले. हे केवळ एक ऑपरेशन नसून, निर्णायक युद्ध आहे असे नेतन्याहू म्हणाले. हा दिखाऊपणा नसून, मनापासून केलेले काम आहे. आपण त्यांना संपवले नाही तर ते परत येतील, असे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत गाझापट्टीमध्ये इस्रायल लष्कराने केलेल्या हल्ल्यात ११ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या