Monday, September 16, 2024
HomeमनोरंजनShiv Thakare: 'खतरों के खिलाडी'मध्ये शिव ठाकरेची दमदार एन्ट्री; मानधन ऐकून व्हाल...

Shiv Thakare: ‘खतरों के खिलाडी’मध्ये शिव ठाकरेची दमदार एन्ट्री; मानधन ऐकून व्हाल थक्क

मुंबई | Mumbai

- Advertisement -

खतरों के खिलाडी १३ (Khatron Ke Khiladi 13) लवकरच सुरू होणार आहे. बिग बॉस १६ नंतर प्रेक्षक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) स्टंटवर आधारित शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान ‘बिग बॉस १६’ शोनंतर प्रसिद्धीझोतात आलेला मराठमोळा शिव ठाकरे (Shiv Thakare) या शोच्या माध्यमातून आता गगन भरारी घेताना दिसणार आहे.

“विचारधारा कोणतीही असो…”; अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ पोस्टने सर्वांनाच टाकले बुचकळ्यात

बिग बॉसमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर शिव आता ‘खतरों के खिलाडी’मध्ये भयानक स्टन्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे. बिग बॉस (Big Boss) 16च्या घरात सर्वांना समजून घेणारा शिव आता वेगळ्या रुपात चाहत्यांना अनुभवता येणार आहे. ‘बिग बॉस १६’ नंतर ‘खतरों के खिलाडी’ शोमध्ये शिवला पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र शिव ठाकरे याचीच चर्चा रंगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी १३’ सीझनचा पहिला स्पर्धक असणार आहे.

अजित पवार यांनी काढली ‘ती’ टीका निकाली

दरम्यान, शिव ठाकरे दुसऱ्याही एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. आणि ते म्हणजे या शो मधलं मानधन. रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ शोसाठी शिव सज्ज झाला आहे. रिपोर्टनुसार, ‘खतरों के खिलाडी’च्या एका एपिसोडसाठी शिव जवळपास ५ ते ८ लाख रुपये घेणार आहे. म्हणजे अभिनेता एका आठवड्यासाठी जवळपास १० ते १६ कोटी रुपये मानधन घेईल. अशी चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग

खतरों के खिलाडी या शोमध्ये आणखी अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली होती, त्यापैकी आणखी दोन टीव्ही सेलिब्रिटींची नावे फायनल झाली आहेत. कुंडली भाग्य मधील अभिनेत्री अंजुम फकीह (Anjum Faqih) आणि रुही चतुर्वेदी (Ruhi Chaturvedi) शोमध्ये धोकादायक स्टंट करताना दिसणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या