Sunday, September 15, 2024
Homeमनोरंजन...आणि न्यायालयात हजर झाली कंगना रणौत; काय आहे प्रकरण?

…आणि न्यायालयात हजर झाली कंगना रणौत; काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

अंधेरी न्यायालयाने (Andheri Court) पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) अटक वॉरंट (Arrest Warrant) बजावण्यात येईल, असा इशारा दिला होता. यानंतर अखेर कंगना (Kangana Ranaut) सुनावणीसाठी न्यायालयात (Andheri Court) हजर झाली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.

कंगना (Kangana Ranaut) गेल्या काही आठवड्यांपासून चित्रीकरणात व्यग्र होती. शिवाय तिला करोनाची लक्षणे (Symptoms of corona) आहेत. कंगनाचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्यास सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची मुभा पुन्हा एकदा मागितली जाईल. त्यावेळी तिचा वैद्यकीय अहवालही सादर केला जाईल, असा दावाही कंगनाच्या (Kangana Ranaut) वतीने करण्यात आला. परंतु कंगनाच्या (Kangana Ranaut) मागणीला अख्तर (javed akhtar) यांच्यातर्फे विरोध करण्यात आला. तसेच आतापर्यंत कंगना (Kangana Ranaut) एकाही सुनावणीला हजर झालेली नाही. या उलट आपण प्रत्येक सुनावणीला हजर राहात आहोत. त्यामुळे सतत गैरहजर राहणाऱ्या कंगनाविरोधात अटक वॉरंट बजावण्याची मागणी अख्तर (javed akhtar) यांच्या वतीने करण्यात आली.

दरम्यान या प्रकरणी सुरू केलेल्या कारवाईला आव्हान देणारी कंगनाची (Kangana Ranaut) याचिका उच्च न्यायालयानेही (High Court) रद्द केल्याकडे अख्तर (javed akhtar) यांच्या वकिलाने न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने (Court) कंगनाची मंगळवारच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मागणी मान्य केली. त्याच वेळी कंगना पुढील सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिली तर तिच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest Warrant) बजावण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने (Court Warning) दिला होता. न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर अखेर कंगनाने २० सप्टेंबरच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजेरी लावली.

काय आहे नेमके प्रकरण?

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एका टीव्हीवर घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने (Kangana Ranaut) आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली’, अशी तक्रार गीतकार जावेद अख्तर (javed akhtar) यांनी वकिल जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान (RR Khan) यांनी कंगनाला (Kangana Ranaut) अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना (Kangana Ranaut) पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर (javed akhtar) यांना दिली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या