Wednesday, April 2, 2025
Homeअग्रलेखअंधानुकरण हा कळीचा प्रश्न

अंधानुकरण हा कळीचा प्रश्न

चातुर्मासाच्या काळात तुळशीचे लग्न कधी असा प्रश्न उपवर मुली-मुलांच्या आईवडिलांकडून कदाचित सर्वाधिक विचारला जात असावा. कारण तुळशीच्या लग्नानंतर विवाहाचे मुहूर्त सुरु होतात. विवाहयोग्य मुले आणि मुलींच्या घरात त्यांचे विवाह जुळणे हा चिंतेचा-चर्चेचा विषय असतो. आपल्या मुलामुलींना मनपसंत साथीदार मिळावा हीच त्यांच्या पालकांची अपेक्षा असते. त्यांच्या विवाहाची इतकी प्रतीक्षा केली जाते हे जर वास्तव असेल तर आजही मुलीचे लग्न आणि त्यासाठीचा खर्च याचा ताण येऊन आत्महत्या करण्याची वेळ एका वडिलांवर का यावी? ही घटना नागपूरमध्ये

वास्तविक विवाह हा दोन कुटुंबांमधील वैयक्तिक आणि नातेवाइकांसाठीचा आनंदसोहळा. तो दिवसेंदिवस अधिकाधिक खर्चिक बनत चालला असावा का? विवाह जुळवतानाचे देणेघेणे हा तर गंभीर विषय. हुंडा देणे आणि घेण्यावर सरकारने कायद्याने बंदी घातली खरी. पण त्यामुळे या प्रथेचे स्वरूप बदलले इतकेच. त्याला हौस, घरातील पहिले किंवा शेवटचे लग्न अशा अनेक शब्दांचा मुलामा घातला गेला. म्हणजेच अप्रत्यक्ष देणेघेणे सुरूच राहिल्याचे आढळते. त्यात मुलामुलींच्या विवाह करण्याच्या बदलत्या कल्पनांची नव्याने भर पडत असावी का? पूर्वी विवाह सामान्यतः एका दिवसात पार पडायचे. त्याच्या स्मृती जपण्याची धडपड ज्यांच्यात्यांच्या परीने केली जायची.

- Advertisement -

नव्या नवरीची त्याच दिवशी सासरी पाठवणी केली जायची. आता त्यात प्री वेडिंग आणि पोस्ट वेडिंग शूट आणि डेस्टिनेशन वेडिंग या कल्पनांची भर पडली आहे. त्यासाठी वेगवेगळी ठिकाणे शोधली जातात. विविध प्रकारचे पोशाख वापरले जातात. ही प्रसंगी अतर्क्य वाटू शकेल अशी कल्पना सिनेसृष्टीने आणली. मग आर्थिक परिस्थिती सधन असणाऱ्यांनी हौस म्हणून ती स्वीकारली आणि समाजात रुजवली. तथापि परिस्थितीचे भान न ठेवता त्याचे अंधानुकरण सगळे करत असावेत का? लग्न एकदाच होते च्या नावाखाली वारेमाप खर्च हि नवप्रथा रुजली असावी का? हळद, मेंदी आणि त्यावेळी वाजणारी वाजंत्री या प्रथांनी चमकदार रूप घेतले आहे. त्यामुळे विवाहसोहळे किमान दोन दिवस चालतात.

यासाठी प्रचंड खर्च होतो. तथापि विवाहसोहळे हे पूरक रोजगार निर्मितीचे साधन मानले जातात घरगुती समारंभांचे व्यवसायात रूपांतर झाले आणि अकुशल व्यक्तींना देखील या व्यवसायाने रोजगारात सामावून घेतले. विविध प्रकारचे कायम रोजगार या व्यवसायाने निर्माण केले. त्यामुळे आर्थिक सधन कुटुंबांच्या थाटामाटात पार पडणाऱ्या विवाह सोहळ्याचे समाज स्वागतच करतांना आढळतो. समाजमाध्यमांचा बोलबाला वाढल्यापासून तर त्याची चमकधमक अधिकच रंगवून दाखवली जाते आणि लोकांच्या पसंतीलाही उतरते. त्यामुळे ज्यांना हौसेचे मोल चुकवणे शक्य आहे त्यांनी जरूर हौस केली तर त्याला समाज आक्षेप घेताना आढळत नाही. तथापि सर्वानाच ते शक्य आहे का याचा विचार उपवर तरुण-तरुणी करतात का? प्रसंगी कर्ज काढू पण धामधुमीत लग्न करूचा अट्टाहास वाढत असावा का? विवाह बंधनाचे मर्म हरवत चालले असून दिखाव्याला महत्व आले असावे का? हे कळीचे प्रश्न आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ०२ एप्रिल २०२५ – कचरा व्यवस्थापन अत्यावश्यकच

0
घनकचरा व्यवस्थापन हा चिंतेचा आणि वादविवादाचा विषय बनला आहे. त्यावर ‘कॅग’च्या अहवालानेही शिक्कामोर्तब केले आहे. घनकचरा व्यवस्थापनात स्थानिक स्वराज्य संस्था अपयशी ठरल्याचा ठपका कॅगने...