Tuesday, May 28, 2024
Homeमुख्य बातम्यासरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा शिथिल

सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा शिथिल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य सरकारने वयाची मर्यादा शिथिल करत सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी खूशखबर दिली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याचे परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे सरकारी नोकरीसाठीची वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढली आहे.

- Advertisement -

शासनाच्या विविध विभागात सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जाणार्‍या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 31 डिसेंबर 2023 पर्यंत दोन वर्ष वाढवून देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्या संदर्भातील परिपत्रक आज जारी केले आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने राज्य शासनातील विविध विभागात 75000 नोकर भरतीची घोषणा सरकारने केली होती. त्या नोकर भरतीत हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरेल. खुल्या प्रवर्गाची कमाल वयोमर्यादा यामुळे 38 ऐवजी 40 वर्ष होईल. तर मागास प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 43 ऐवजी 45 वर्षे होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या