Friday, May 3, 2024
Homeनाशिकवाढीव वीजबिल रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन

वाढीव वीजबिल रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन

सातपूर | प्रतिनिधी

लॉक डाउन काळात कष्टकरी व सामान्य नागरिकांना रोजंदारी बंद असल्यामुळे जगणे मुश्किल झाले आहे अशा वातावरणात वीज मंडळाने शंभर पट वीज बिल आकारणी करून कष्टकऱ्यांना संक्रात टाकलेला आहे. मंडळाने हे बिल तातडीने मागे घ्यावे व शासनाने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे अशी मागणी समितीच्या वतीने सातपूर येथे करण्यात आली.

- Advertisement -

शहर व परिसरातील कष्टकरी कामगार रिक्षाचालक भाजीविक्रेते यासह उद्योजकही लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद करून होते. अजूनही अनेक कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध झालेले नाहीत अशा वातावरणात पाचशे रुपये वीजबिल येणार याच्या जागी तीन महिन्याचे एकत्रित पाच हजार रुपयांचे बिल आकारणी करण्यात आलेली आहे.

600 रुपयांच्या जागी सहा हजार रुपये आकारणी केली आहे हे कष्टकऱ्यांसाठी जास्त असून हे तातडीने वीज मंडळाने बिल मागे घ्यावी व राज्य शासनाने लोक डाऊन काळातील वीज बिले माफ करावीत अशी मागणी तिच्या वतीने करण्यात आली.

यावेळी सिटीचे सिताराम ठोंबरे सिंधू शार्दुल मकरंद रानडे आदींसह पदाधिकारी निवडक नागरिकांसह लातूर विभागाच्या वीज मंडळ कार्यालयावर गेले होते.

त्याठिकाणी त्यांनी घोषणा देऊन शासनाच्या धोरणाचा निषेध केला विज बिल मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही निवेदनाद्वारे अधिकाऱ्यांना देण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या