अकोले |प्रतिनिधी| Akole
अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 287 अर्जांपैकी 11 अर्ज छाननीत नामंजूर झाले आहेत.त्यामुळे आता 276 अर्ज शिल्लक राहिले आहेत.
काल झालेल्या छाननीत खालील उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. ऊस नसणे, प्रतीज्ञा पत्रावर सही नसणे, आणि गटात नाव नसणे या कारणांमुळे हे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यात अकोले गट-दत्तात्रय नाईकवाडी, आनंदा वाकचौरे, इंदोरी गट-सोमनाथ थोरात,संदीप नवले, आगर गट-बबनराव तिकांडे, कोतुळ गट-मीना देशमुख, शिवाजी फापाळे,मारुती बुळे, देवठाण गट-गोरक्ष आंबरे, भटक्या विमुक्त जाती जमाती-कोंडाजी ढोण्णर, इतर मागासवर्ग-भास्कर मंडलिक यांचा समावेश आहे.
विविध गटात व राखीव जागांवर शिल्लक असलेल्या अर्जाची संख्या पुढीलप्रमाणे- अकोले गट- 39 ,इंदोरी-36,आगर गट-31,कोतुळ-30,देवठाण-22, बिगर उत्पादक/पणन संस्था प्रतिनिधी-7, अनुसूचित जाती जमाती-8,महिला राखीव-28, इतर मागासवर्गीय मतदार संघ-30, भटक्या विमुक्त जाती जमाती-8. काल बुधवारी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
दि. 22 जून ते 6 जुलै अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. माघारीनंतरच निवडणलकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.