Tuesday, February 3, 2026
HomeनगरShirdi : साईबाबांविषयी अपप्रचार; अहम ब्रह्मास्मी युट्युब चॅनल चालकावर गुन्हा दाखल

Shirdi : साईबाबांविषयी अपप्रचार; अहम ब्रह्मास्मी युट्युब चॅनल चालकावर गुन्हा दाखल

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक भाषेचा वापर करून साईबांविरुद्ध बदनामीकारक मोहीम चालवल्याप्रकरणी अहम ब्रह्मास्मी नावाच्या युट्युब चॅनल चालकावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईबाबांची बदनामी करणार्‍या या प्रकारामुळे साईभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी साईबाबा संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास अशोक माळी यांनी बुधवारी या संदर्भात शिर्डी पोलिसात फिर्याद दिली आहे. अजय (पूर्ण नाव अज्ञात) नावाचा इसम हा युट्युब चॅनल चालवत असून त्याने तब्बल 27 पेक्षा जास्त व्हिडिओंद्वारे ही सुनियोजित बदनामी मोहीम राबवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisement -

हैदराबाद येथील प्रमोदकुमार चंदा या साईभक्ताने 30 ऑक्टोबर रोजी या गंभीर प्रकाराची माहिती संस्थानला दिली. प्रामुख्याने तेलगू भाषेत असलेल्या या व्हिडिओंमधून दक्षिण भारतातील भाविकांच्या मनात संभ्रम आणि द्वेष पसरवण्याचा उद्देश दिसतो. आरोपीने श्री साई सच्चरित्रातील शिकवणुकीचा जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ लावून साईभक्तांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.

YouTube video player

साईबाबांच्या विषयी बदनामीकारक व चुकीच्या शब्दांचा वापर करून दोन धार्मिक समुदायांमध्ये शत्रुत्व आणि तेढ निर्माण करण्याचा हा स्पष्ट प्रयत्न आहे. या व्हिडिओंमुळे फिर्यादीसह लाखो साईभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. यापूर्वीही अशा विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींवर संस्थानाने गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...