Saturday, November 16, 2024
HomeनगरAhilyanagar Assembly Election 2024 : आ. जगताप यांच्यासमोर हॅट्रीक साधण्याचे आव्हान

Ahilyanagar Assembly Election 2024 : आ. जगताप यांच्यासमोर हॅट्रीक साधण्याचे आव्हान

अहिल्यानगर नगर शहर विधानसभा मतदारसंघाकडे कायम जिल्ह्याचे लक्ष असते. हा मतदारासंघ जिल्ह्याचा आरसा असून नेहमी याठिकाणी कोण आमदार होणार याकडे सर्वांचे लक्ष असते.

गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये आ. संग्राम जगताप यांनी याठिकाणी विजय मिळवलेला असून यंदा त्यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आव्हान आहे. हे आव्हान आ. जगताप कसे पार करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान नगरकरांचा विकासाच्या बाजुने उभे राहणार असल्याचा कौल समोर येत आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आ. जगताप यांनी २०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन शिवसनेचे आ. अनिल राठोड यांची आमदारकी काढून घेत विजय २५ वर्षांची संपादन केला. तसेच नगर शहरातील महत्त्वाची सत्ता असणारी मनपा ताब्यात घेतली. त्यानंतर नगर शहरातील राजकारणात निर्माण केलेली पकड आणि त्यांच्या कुटुंबियांनी आतापर्यंत आ. जगताप कधीच सुटू दिली नाही. यंदाच्या निवडणुकीत आ . जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर रिंगणात आहेत. दोन्ही राष्ट्रवादींत लढत आहे.

नगर शहर मतदारसंघ पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असे. राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणल्यानंतर दोन्ही शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. त्याचा परिणाम दिवंगत नेते यांच्यानंतर कोणताही नेता शहरावर प्रभाव शकला नाही. त्यामुळे शिवसेना विस्तारली तर नगर राठोड टाकू नाही. दुसरीकडे राज्यात सातत्याने वाढणारी भाजप शहरात मोठे नेतृत्व उदयाला घालण्यात असमर्थ ठरला.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात महायुती झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (शिंदे गट) यातील नेते एकाच व्यासपीठावर आले. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या तीनही प्रमुख पक्षातील नेत्यांनी एकजूट दाखवित उमेदवार आ. जगताप यांचे हात बळकट केले. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) कळमकर यांना उमेदवारी मिळाली. २०१९ च्या निवडणुकीत आ. जगताप ८१ हजार २१७ मते मिळवून विजयी झाले होते. त्यांना एकूण मतदानाच्या ४७.७३ टक्के मतदान मिळाले होते. प्रतिस्पर्धी उमेदवार दिवंगत नेते अनिल राठोड यांना ७० हजार ७८ मते मिळाली होती. त्यांची टक्केवारी ४१.१९ होती. केवळ ११ हजार १३९ एवढे मताधिक्य होते.

२०१४ च्या निवडणुकीत आ. जगताप यांना ४९ हजार ३७८ मते होती. त्यावेळी मतांची टक्केवारी ही २९.७९ टक्के होती. तर अनिल राठोड यांना ४६ हजार ६१ मते होती. तत्कालीन भाजपचे उमेदवार अभय आगरकर यांना ३९ हजार ९१३ मते होती. त्यांच्या मतांची टक्केवारी ही २४ टक्के होती. आताच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेतील एक गट आ. जगताप यांच्या सोबत आहेत. तर शिवसेनेतील राठोड गट विरोधात असून त्याचा किती फायदा शरद पवार गटाचे उमेदवार कळमकर घेणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आ. जगताप वर्षभरापासून निवडणुकीची तयारी केली होती. तर कळमकर यांना उमेदवारी मिळेपर्यंत संघर्ष करावा लागला. यामुळे नगर शहरात कोण बाजी मारणार यासाठी निकालापर्यंत वाट पहावी लागणार आहे.

विधानसभेत मनपाचे टार्गेट

विधानसभा झाल्यानंतर लगेचच महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे. नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी असेल. त्यामुळे भावी नगरसेवक आपल्या नेत्यांच्या मागे प्रचारात खंबीरपणे उभे आहेत. उमेदवाराचा प्रचार करताना स्वतःचेही ब्रडिंग करून घेत आहेत. त्यामुळे ही निवडणूक महापालिका लढतीची नांदी असेल, असे मानले जाते. यामुळे आतापासून शहरातील प्रमुख भागातील नेते आपल्या बाजूने वळवण्यासाठी आ. जगताप यांचे प्रयत्न सुरू आहेत. यात त्यांना यश येताना दिसत आहे. तर कळमकर हे लोकसभेप्रमाणे विशिष्ट समिकरण जुळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या