Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमपरप्रांतीय कामगारांना लाकडी दांडक्याने मारहाण

परप्रांतीय कामगारांना लाकडी दांडक्याने मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

किरकोळ वादातून परप्रांतीय कामगारांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना सावेडी उपनगरात पाईपलाईन रोड वर वाणीनगर कमानीजवळ शुक्रवारी (दि.4) सकाळी घडली. याबाबत भोले सेनी (रा.तागडवस्ती, मूळ रा. राजस्थान) याने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

फिर्यादी हा त्याचा भाऊ व अन्य एका नातेवाईकासह गेल्या 8 वर्षांपासून नगरमध्ये राहात असून ते तिघे एका ठेकेदाराकडे फरशी बसविण्याचे काम करतात, गुरुवारी (दि.3) सायंकाळी ते कामावरून घरी जाण्यासाठी वाणीनगर कमानीजवळ आले असता त्यांचे व कृष्णा शिंदे (रा. वैदुवाडी) याचे किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यावेळी तो तुमच्या कडे पाहतो असे म्हणत तेथून निघून गेला.

YouTube video player

त्यानंतर फिर्यादीसह तिघे शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास पुन्हा कामावर जाण्यासाठी वाणीनगर कमानीजवळ आले असता तेथे कृष्णा शिंदे हा त्याच्या अन्य 2 अनोळखी साथीदारांसह आला. त्याने आल्यावर शिवीगाळ सुरु करत फिर्यादीच्याडोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्यास जखमी केले. त्यावेळी फिर्यादीचा भाऊ व नातेवाईक सोडवायला आले असता त्यांना ही या तिघांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या