Thursday, October 1, 2026
HomeनाशिकNashik News : कांदा बाजारभावात घसरण; संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Nashik News : कांदा बाजारभावात घसरण; संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

येवला | प्रतिनिधी | Yeola

कांदा बाजारभावात (Onion Rate) घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज, बुधवारी, (दि. ४) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ‘जय जवान जय किसान, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे ‘ अशा जोरदार घोषणा देत शेतकरी अचानकपणे पुणे – इंदोर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या आंदोलना मुळे पुणे – इंदोर महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

- Advertisement -

यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने छावा संघटनेने तहसीलदार आबा महाजन यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी सहकाऱ्यांसह उपस्थित होते. दोन हजार रुपयांपेक्षा कमी भावाने विकलेल्या कांद्याला (Onion) प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान द्यावे, मकाच्या आधारभुत किंमतीपेक्षा कमी भावाने विकलेल्या मकाला राज्य सरकार व केंद्र सरकारने ५० % रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्यावी, निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना अनुदान देण्यात यावे, ३० जुन २०२६ अखेर होणाऱ्या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी शर्ती न लावता सरसकट कर्ज माफी करण्यात यावी व त्वरीत नवीन कर्ज वाटप करावे, आदी मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आंदोलनात शेतकरी (Farmer) आघाडीचे गोरख संत, प्रफुल्ल गायकवाड, विजय मोरे , सोपान लांडगे, दिपक सहानखोरे, सागर पठारे, संतोष कदम, संदीप पवार, वैभव भड, प्रिया वरपे, गोरख सांबरे, गोरख कोटमे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते


ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : ​मान खाली, तोंडावर मास्क! खरातची गुर्मी उतरली; ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik दैवी शक्ती, भविष्याची भिती आणि मंत्र-तंत्राचा धाक दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार करुन नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक (Fraud) करणाऱ्या संशयित अशोककुमार एकनाथ...